कारागृहातून सुटका झालेले समीर गायकवाड यांचे घरी औक्षण करून स्वागत !

कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणातील संशयित म्हणून अटक करण्यात आलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांची १९ जून या दिवशी सायंकाळी ५.१० वाजता कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून जामिनावर मुक्तता करण्यात आली.

(म्हणे) ‘समीर गायकवाड याला मिळालेल्या जामिनावरून सनातनचे फरार आरोपी साधक पकडले जाणे किती आवश्यक आहे, हे कळते !’

सनातनचे साधक विनय पवार आणि सारंग अकोलकर हे दोघे गेल्या ९ वर्षांपासून फरार आहेत. त्यांच्यावर सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने) ५ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले आहे. त्या दोघांची नावे डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपपत्रांमध्येही आहेत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर राहून नातेवाइकांच्या मनावर साधना आणि नामजप करण्याचे महत्त्व बिंबवणारे श्री. समीर गायकवाड !

मला एवढेच सांगायचे आहे की, गुरुमाऊलीने आपल्याला सांगितलेला जप अनमोल आहे. आपण अधिकाधिक नामजप करण्याचा प्रयत्न करूया. मी आता थांबतो. हे पत्र जसे सुचले, तसे देवाने लिहून घेतले. काही चुकल्यास क्षमा करा.

सनातन संस्था आणि समीर गायकवाड यांच्यावर टीका करणार्‍या पुरोगामी संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना १७ जूनला अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी जामीन संमत केला. त्यानंतर पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या पोटात गोळा आला आहे.

(म्हणे) ‘समीर गायकवाड यांना जामीन मिळणे अयोग्य !’ – माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

कॉ. गोविंद पानसरे यांनी कामगारांसाठी सामान्य जनतेसाठी सतत संघर्ष केला. बहुजनांचे शिवराय ज्यांनी पुस्तकातून सर्वांपर्यंत पोहचवले आहेत, अशा कॉ. पानसरे यांची हत्या होते आणि त्यांचे मारेकरी अजूनही पोलिसांना सापडत नाहीत.

सनातनचे साधक समीर गायकवाड यांची कळंबा कारागृहातून सुटका !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संशयित आरोपी तथा सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांचा जामीन १७ जूनला येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी संमत केला होता.

समीर गायकवाड यांना पुरोगाम्यांपासून धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी !

श्री. समीर गायकवाड यांना अटक झाल्यापासून पुरोगाम्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. तरी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता श्री. समीर यांच्या जिवाला धोका असल्याने शासनाने श्री. समीर यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे, अशी एकमुखी मागणी हिंदुत्वनिष्ठांच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.

समीर गायकवाड यांना मिळालेला जामीन ही पुरोगाम्यांना सणसणीत चपराक ! – सनातन संस्था

अखेर सत्याचा विजय झाला. कोल्हापूरमधील अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायालयाने सनातनची न्याय्य बाजू मान्य करत अटकेत असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना जामीन मंजूर केला. त्याविषयी आम्ही न्यायालयाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

श्री. समीर गायकवाड यांच्या जामिनावर सुटण्याला विरोध करणाऱ्या सरकारी अधिवक्त्यांनी न्यायाची बाजू मांडण्याचे कर्तव्य पार पाडले का ?

‘कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांची १७.६.२०१७ या दिवशी अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी जामिनावर सुटका केली.

येणारे वर्ष सर्वच हिंदुत्वनिष्ठांच्या जामिनाचे ! – अधिवक्ता पुनाळेकर

अन्वेषणकाळात श्री. समीर गायकवाड यांना १७ जून या दिवशी जामीन मिळाला आहे. सनातन संस्था आणि सनातनचे साधक यांच्यावर जे अनन्वित अत्याचार केले गेले. ते अत्यंत चुकीचे होते, हेच त्यातून दिसून येते.