पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या धर्मरथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद !

शिरवळ येथील प्रदर्शनास भेट देतांना जिज्ञासू

पुणे, ३१ मे (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथाच्या माध्यमातून सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन सहकारनगर, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, कोथरूड, हडपसर, सिंहगड रस्ता, विश्रांतवाडी, शिरवळ (जिल्हा सातारा) येथे लावण्यात आले. त्याला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सहकारनगर येथे भाजपच्या नगरसेविका सौ. साईदिशा माने यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्या म्हणाल्या, ‘‘सनातनच्या उपक्रमास माझे नेहमी सहकार्य राहील. हे कार्य पाहून मला प्रेरणा मिळाली. समाजाचे अधःपतन थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे.’’ गावठाण येथे झालेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री दगडूशेठ गणपति दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अधिवक्ता शिरीष मोहिते, सिंहगड रस्ता येथे नगरसेवक प्रसन्न जगताप, कोथरूड येथे भाजपचे नगरसेवक श्री. जयंत भावे, हडपसर येथे भाजपचे नगरसेवक मारुति (आबा) तुपे यांच्या धर्मरथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

हडपसर येथील प्रदर्शनाला भेट देतांना जिज्ञासू

विशेष

श्री. प्रसन्न जगताप यांनी स्वतः धर्मरथाचे उद्घाटन झाल्याची पोस्ट त्यांच्या ‘फेसबूक’वर टाकली. ‘सनातन संस्थेचा धर्मरथ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लावण्यात येतो. धर्मरथामध्ये धर्मशिक्षण, राष्ट्ररक्षण, यांविषयी प्रबोधन करणारे विविध सात्त्विक ग्रंथ असतात. परिसरातील सर्व नागरिकांना मी मनःपूर्वक आवाहन करतो की, सर्वांनी आवर्जून धर्मरथास अवश्य भेट द्यावी आणि सनातनच्या कार्यास सहकार्य करावे’, असे पोस्टमध्ये त्यांनी आवाहन केले होते.

विश्रांतवाडी येथे धर्मरथातील प्रदर्शन लावण्यासाठी जागा मिळण्यास अडचण येत होती. त्या वेळी एक धर्मप्रेमी श्री. व्यास यांच्याशी सनातनच्या साधकांचा संपर्क झाल्यानंतर त्यांनी लगेचच त्यांच्या इमारतीच्या समोरील जागेत प्रदर्शन लावण्यासाठी जागा दिली आणि आपुलकीने सहकार्यही केले. त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment