समष्टी साधना करतांना संचित आणि प्रारब्ध नष्ट कसे होते?

समष्टी साधना करतांना साधक जसजसा समाज, राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्याशी हळूहळू एकरूप होतो, तसतसा त्याचा अहं हळूहळू न्यून होत जातो. साधक समष्टीशी पूर्णपणे एकरूप झाला की, त्याचा अहं पूर्णपणे नाहीसा होतो. अहंकार, मीपणा संपला की, पाप-पुण्य, क्रियमाण, संचित, प्रारब्ध इत्यादी काहीच उरत नाही. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई.(२५.६.२०१३)

Leave a Comment