सिंहाने प्राणी किंवा माणसाला मारणे आणि मनुष्याने प्राणीहत्या करणे यांतील भेद

कोणत्याही कर्मामागील हेतू काय असेल, त्यानुसार फळ मिळते. सिंहाला ज्या वेळी भूक लागते, त्या वेळी तो प्राण्यांना मारून पोट भरतो. तो माणसालाही मारू शकतो. ही नैसर्गिक क्रिया असल्याने येथे पाप-पुण्याचा प्रश्न येत नाही. मनुष्य स्वतःला शिकारीचे आणि मांस खाण्याचे सुख मिळावे; म्हणून तो प्राण्यांची हत्या करतो. तसेच द्वेष, लोभ, मत्सर, सूड घेणे इत्यादींसाठी एक मनुष्य दुसऱ्याची हत्या करतो; म्हणून त्याला हत्येचे पाप लागते.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९८१)

Leave a Comment