एकत्र कुटुंबपद्धतीमुळे भारतामध्ये आपत्काळात केवळ १.२५ टक्के आपद्ग्रस्तांचे मनोधैर्य ढासळणे, तर पाश्‍चात्त्य देशांत ३० ते ४० टक्के एवढ्या जणांचे मनोधैर्य ढासळणे

त्सुनामी झाली, तरी तामिळनाडूचा समुद्रकिनारा आणि अंदमान-निकोबार येथील उद्ध्वस्त कुटुंबे केवळ त्यांच्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे, तसेच नातेवाईक आणि जातभाई यांच्याकडून मिळालेल्या आश्‍वासक साहाय्यामुळे स्वतःला सावरू शकली. ख्रिस्ताब्द १९९९ मध्ये लातूर आणि ख्रिस्ताब्द २००० मध्ये भूज येथे झालेल्या भूकंपांत कुटुंब, तसेच नातेवाईक यांच्याशी असलेल्या संबंधामुळे लोक सावरू शकले. केवळ १.२५ टक्के आपद्ग्रस्तांचे मानसिक स्थैर्य ढासळले. याउलट पाश्‍चात्त्य देशांत ३० ते ४० टक्के जणांचे मानसिक स्थैर्य ढासळले. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई. (१८.९.२०१३)

Leave a Comment