गुरुपौर्णिमा : हिंदूंनो, भावी भीषण काळात जिवंत रहाण्यासाठी संत आणि गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करा !

भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना, म्हणजे सनातन धर्मराज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी काळानुसार प्रयत्न करणे, हेही एक प्रकारचे समष्टी गुरुकार्य आहे. आज धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि अहिंदू राजकारणी हिंदु राष्ट्र या शब्दालाच विरोध करत आहेत. अध्यात्माचा अभ्यास नसल्यामुळे त्यांना कालमाहात्म्य, सूक्ष्म जगत्, भगवंताची कृपा इत्यादी गोष्टी कळत नाहीत. खरे तर पृथ्वीवरील घटना क्षुल्लक असतात. स्थुलातून घडणारी प्रत्येक घटना ही सूक्ष्मातून आधीच घडलेली असते. खरे युद्ध देव आणि असुर यांच्यात होत असते आणि प्रत्येक युद्धात देवच जिंकत असतात. सध्या पृथ्वीवर सनातन धर्मराज्याच्या स्थापनेसाठी चालू असलेल्या सूक्ष्मातील युद्धात देवता आणि संत यांच्याकडून भूवलोकापासून ६ व्या पाताळापर्यंतच्या आसुरी शक्ती पराभूत झाल्या आहेत. त्याचा भारतावरील दृश्य परिणाम म्हणजे सर्वत्र तामसिक राजकीय पक्षांचा पराभव होऊन राजसिक राजकीय पक्षांचा विजय होत आहे. सध्या देवता आणि संत यांच्या माध्यमातून सातव्या पाताळांतील शक्तींविरुद्ध चालू असलेल्या सूक्ष्मातील महायुद्धाचे परिणाम येत्या २ – ३ वर्षांत पृथ्वीवर दृश्य रूपात दिसतील. सातव्या पाताळातील शक्तींशी चालू असलेले सूक्ष्मातील युद्ध हे अंतिम असल्याने ते निकराचे होईल. हा काळ हिंदु धर्मविरोधी शक्तींना जेवढा अनुकूल आहे, तेवढाच हिंदु धर्मप्रेमींसाठी प्रतिकूल आहे.

वर्ष २०१८ नंतर सर्वत्र अराजकसदृश स्थिती निर्माण होईल. तसेच पुढे तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळेही जीवन जगणे असह्य होईल. अनेक द्रष्ट्या संतांनीही भावी काळ हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण विश्‍वासाठी भीषण आहे, असे सांगितले आहे. अशा भीषण काळाला तोंड देण्यासाठी प्रचंड आत्मबल लागते. हे आत्मबल केवळ संतांची कृपा आणि साधना यांच्यामुळेच प्राप्त होऊ शकते.

सध्याचा काळ वाईट असला, तरी वर्ष २०२३ नंतरचा काळ सनातन धर्माला पूरक आहे. याच काळात सत्त्वगुणी लोकांकडून भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.
गुरुपौर्णिमा हा साधनेतील मार्गदर्शक संत आणि गुरु यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. खरेतर केवळ कृतज्ञता म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्यापेक्षा वर्षभर संत आणि गुरु यांना सांगितलेली साधना करणे गुरुतत्त्वाला अपेक्षित असतेे. हिंदूंनो, भावी भीषण काळात किमान जिवंत रहाण्यासाठी तरी संत आणि गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याचा निश्‍चय या वर्षीच्या गुरुपौर्णिमेपासून करा !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.३.२०१७)