हिंदूंच्या उत्सवात अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत असल्याने सात्त्विकतेचा ऱ्हास होत आहे !

आपण असत्याला सत्य समजतो. समजण्यात भेद झाला, तर विचारांत भेद होतो. विचारांत भेद झाला, तर कार्यात भेद होतो.

आपण गणपति उत्सव हा समष्टी पूजा म्हणून करतो; पण तोही विकृत स्वरूपात साजरा होतांना दिसून येतो. पूजेचा योग्य अर्थ न समजल्यामुळे असे झाले आहे. हिंदूंच्या उत्सवात अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत आहे. त्यामुळे सात्त्विकतेचा र्‍हास होत आहे. खर्‍या चैतन्यदायी पूजेत किती सामर्थ्य आहे, हे कळायला पाहिजे. चैतन्यदायी पूजेचा प्रसार करणे, म्हणजे समष्टी साधना होय.

अशा प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वसुधैव कुटुम्बकम् ।, म्हणजे संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे, या तत्त्वानुसार समष्टी साधना शिकवली आहे. यासाठी साधकांनी समष्टीला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment