साधकांनो, जप म्हणजे काय आणि भगवंताचा जप सतत करण्याची आवश्यकता काय ?

‘जप म्हणजे काय ? भगवंताचा सतत जप करण्याची आवश्यक काय ? सतत भगवंताशी अनुसंधानित रहाणे, म्हणजे सतत ‘भागवत’ (भगवंताची स्तुती) चालू रहाणे होय. भागवतातील गोष्टी या अनुभूती आहेत. भगवंताची सतत स्तुती करत रहाणे, हेच जीवनाचे लक्षण आहे. सतत त्याच्या ‘स्मरणात’ रहाणे, हे जीवन आहे. येथे सर्वत्र चैतन्य ठासून भरले आहे. तसेच चैतन्याचे स्मरण करणे, ‘चैतन्याविना काहीच नाही’, असे पहाणे, सर्व इंद्रियांद्वारे चैतन्याचे स्मरण होणे आणि त्याद्वारेच कार्य होत असल्याचे जाणणे, हे जीवन आहे. नाम हे भगवंताच्या सतत स्मरणाचे आणि त्याच्या अनुसंधानाचे एक साधन आहे. भगवंताच्या नामात त्याची गुणवैशिष्ट्ये सामावलेली असल्याने त्यात त्याची चैतन्यशक्ती अनुस्यूत असते.

परात्पर गुुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) स्तुती करत रहाणे, म्हणजे चैतन्याची स्तुती करणे आहे. त्यांनी चैतन्य मिळवले आहे. त्यांच्याशी अनुसंधानित रहाणे, म्हणजे चैतन्याशी अनुसंधानित रहाणे आहे. त्यातून चैतन्य ग्रहण करत आनंदात रहाणे, हे खरे भाग्य आहे.’

Leave a Comment