सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय तथा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद !

सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय तथा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद !

१. ऋषींनी सांगितलेले सनातन धर्माचे (हिंदु धर्माचे) भविष्य, जे पुढे इतिहास झाले !

अ. वेद, चारही युगांविषयी, तसेच वाल्मीकिऋषींनी लिहिलेले रामायण असो, महर्षि व्यासांनी लिहिलेले महाभारत असो किंवा वर्तमानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २०२३ या वर्षी येऊ घातलेल्या हिंदु राष्ट्राविषयी केलेले लिखाण असो, ते भविष्यात काय घडणार ? यांविषयी लिहिले गेले.

आ. समाजाने ते सनातन धर्माचा इतिहास म्हणून स्वीकारले आहे.

इ. प्रत्यक्षात ते द्रष्ट्या ऋषीमुनींनी लिहिलेले भविष्य होते; किंबहुना ते ईशशक्तींचे संकल्प होते, जे भविष्यात साकार झाले आहेत आणि होणार आहेत.

२. अन्य धर्मीय किंवा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण

अ. अन्य धर्मीय किंवा राष्ट्रे यांचा इतिहास हा घटना घडल्यानंतर लिहिला जातो.

आ. काही जण स्वराष्ट्राच्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ लिखाण करतात, तर काही जण लांगूलचालन करत आपल्या राजाचे दोष किंवा पराजय लपवून त्यांचे अवास्तव गुणगौरव रेखाटतात. याउलट धूर्त ख्रिस्ती किंवा पं. नेहरू किंवा साम्यवादी यांच्याकडून राष्ट्राचा इतिहास जाणीवपूर्वक चुकीचा लिहून देशांतील लोकांमध्ये संभ्रम पसरवला जातो.

इ. वस्तुनिष्ठता आणि सत्यता सोडून धूर्ततेने लेखन केलेला इतिहास हा आसुरी असल्यास नवल ते काय !

– पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, उत्तर भारत प्रसारसेवक, सनातन संस्था आणि राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.