विविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचे कारण

विविध नाड्या आणि संहिता यांत विविध ऋषींनी सांगितलेली माहिती असते. नाडी आणि संहिता यांचे वाचन करणार्‍यांकडे येणारे बहुतेक सर्वच सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍न विचारतात आणि त्यांना ऋषींकडून उत्तरही मिळते. त्यासंदर्भात मला वाटायचे, ऋषी एवढे ज्ञानी असूनही सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍नांची उत्तरे का देतात ?, असा प्रश्‍न मनात येण्याचे कारण म्हणजे मी कोणाला कधीच मायेतील प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. आज या प्रश्‍नाचे उत्तर माझ्या लक्षात आले. ईश्‍वर जसा मायेतील प्रश्‍नांची उत्तरे देतो, तसेच ऋषीही देतात; कारण सगुण-निर्गुण नाही भेदाभेद ! हे तत्त्व त्यांच्यात भिनलेले असते आणि ते माझ्यात नाही; म्हणून मी केवळ साधनेत प्रगती करू इच्छिणार्‍या साधकांच्याच साधनेविषयक प्रश्‍नांची उत्तरे देतो.