मना-विरुद्ध-नाम, तेच खरे काम !

‘मना’चे उलटे (खरे पहाता हेच सुलटे आहे) केले, तर ‘नाम’ होते. मनाला नामात गुंतवले तर उत्तम. तेच खरे कामास येते. नाम आहे म्हणून मनुष्य आहे. मनाकडे पहाण्याऐवजी, म्हणजेच मनाच्या विकारांना कुरवाळण्याऐवजी नामाकडे लक्ष दिले, तर देवाची कृपा झाल्याशिवाय रहाणार नाही. मन म्हणजे बाळ आणि जीव म्हणजे आई आहे. आई काळजी घेते, तसे जिवाने मनाची काळजी घायला हवी. मनाशी संवाद साधायला हवा. स्वयंसूचना देतांनाही त्याला सांगावे, ‘अरे मना, तुला देवाकडे जायचे आहे. तू सतत देवाच्या गोड नामाच्या अनुसंधानात रहा !’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (५.४.२०१७, रात्री ७.५३)

Leave a Comment