प.पू. डॉक्टरांच्या ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे, ते ते ईश्‍वर देईल, या वाक्याची आलेली प्रचीती !

प.पू. डॉक्टरांच्या ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे, ते ते ईश्‍वर देईल, या वाक्याची आलेली प्रचीती !

तमिळनाडू येथे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा ५० सहस्रांपेक्षा अधिक लोक भोजन भंडार्‍यासाठी आले होते. त्यासाठी किमान ७० ते ८० लक्ष रुपये व्यय आला होता; परंतु पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी सांगितल्याने त्यांच्या भक्तांनीच बहुतांश व्यय केला. संस्थेला काही व्यय आला नाही. तेव्हा अनेक वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांनी उच्चारलेल्या एका वाक्याची प्रचीती आली. ते म्हणाले होते, ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक असेल, ते ते ईश्‍वर उपलब्ध करून देईल ! पूर्वी प.पू. डॉक्टरांनी ग्रंथांमध्ये लिहिले आहे, गुरुकृपायोगामध्ये साधकांना सिद्धी लाभणार नाहीत; पण ज्या वेळी जे आवश्यक असेल, त्या वेळी ते संबंधित साधकाला प्राप्त होईल. त्यानंतर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मक्रांती करतांना पुष्कळ धनाची आवश्यकता असेल, असे सूत्र चर्चेत आले होते. त्या वेळी प.पू. डॉक्टर म्हणाले होते, ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक असेल, ते ते ईश्‍वर उपलब्ध करून देईल !
– पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, उत्तर भारत प्रसारसेवक, सनातन संस्था आणि राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.