ऋषींच्या सांगण्याप्रमाणे देह उभा चिरून देत असतांना त्याग सत्कारणी लागल्याने राजाच्या डोळ्यांत आनंदाश्रू येणे

‘एक राजा त्यागासाठी प्रसिद्ध होता. एकदा त्याची परीक्षा घेण्यासाठी एक ऋषी त्याच्याकडे गेले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझे शरीर उभे चिरून त्यातील उभा भाग मला दे; परंतु तू खरा त्यागी असशील, तर तुझ्या डोळ्यांत दुःखाश्रू येता कामा नयेत.’’ राजाचे शरीर उभे चिरण्यास आरंभ झाला. तेव्हा राजाच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझा त्याग मला मान्य नाही.’’ राजा म्हणाला, ‘‘महाराज, माझ्या उजव्या डोळ्यातून आनंदाश्रू येत आहेत; कारण आज त्याग सत्कारणी लागल्याचा आनंद मिळत आहे.’’ महर्षींनी विचारले ‘‘तर मग राजा, तुझ्या डाव्या डोळ्यात अश्रू का ?’’ राजाने उत्तर दिले. ‘‘महाराज डाव्या डोळ्याला आज आपल्या भावाचा म्हणजे उजव्या डोळ्याचा त्याग आणि त्याचे भाग्य यांमुळे आनंद होत आहे. त्यामुळे तोही आनंदाश्रू ढाळत आहे.’’

– कै. सद्गुरु (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) (वर्ष १९९०)

Leave a Comment