दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा !

आपत्काळातील पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !

मनुष्याची विविध कुकर्मे आणि त्यानुसार त्याला होणार्‍या नरकयातना (श्रीमद्भागवत्)

शुकदेव गोस्वामी महाराज परिक्षिताला सांगतात, हे राजा, हे जग ३ प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्यामुळे त्यांना ३ वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम भोगावे लागतात. चांगली कृत्ये करून माणसे स्वर्गीय जीवनात आनंदी रहातात. वाईट कृत्यांमुळे आणि अज्ञानामुळे त्याला वेगवेगळ्या नरकयातना भोगाव्या लागतात.

जीवनातील नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून आनंद मिळवा !

नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तीला व्यवहारातील सुख मिळत नाही आणि ती साधनेत आनंद मिळवू शकत नाही. या लेखात नकारात्मकतेची कारणे, नकारात्मकतेमुळे होणारे दुष्परिणाम, नकारात्मकता दूर करण्यासाठी करावयाचे उपाय इत्यादी दिले आहेत. हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

‘दान’ या संकल्पनेविषयी पू. अनंत आठवले यांना साधिकेने विचारलेले प्रश्‍न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे

 ‘मी दान देत आहे’, अशी भावना देतांना मनात असली, तर ते ‘दान’ होईल. दानामध्ये तीन गोष्टी आल्या. ती वस्तू स्वतःची असल्याचे मानणे, म्हणजे ममत्व आले; दान देण्याचे कर्तृत्व, म्हणजे कर्तेपणा आला आणि ‘मी दान देतो’, हा अहंकार आला.

पू. भगवंतकुमार मेनराय यांनी श्वासासह नामजप जोडता यावा, यासाठी केलेले मार्गदर्शन

साधकांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांना नामजप श्वासाशी जोडायचा आहे आणि श्वास नामजपाशी जोडायचा नाही, म्हणजे नामजपाच्या लयीत श्वासोच्छ्वास करायचा नाही, तर श्वासाच्या लयीत नामजप करायचा आहे.

योगासने आणि प्राणायाम यांचा होणारा लाभ ते नामजपासहीत केल्याने अधिकच वाढतो !

२१ जून हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘योग’ या शब्दाचा उगम ‘युज’ या धातूपासून झाला आहे. ‘युज’ याचा अर्थ ‘संयोग होणे’ असा आहे. ‘योग’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे’ असा आहे. योगशास्त्राचा उगम सुमारे ५००० वर्षांपूर्वी भारतात झाला आहे….

दान आणि अर्पण यांचे महत्त्व अन् त्यांतील भेद

‘पात्रे दानम् ।’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे. दानाचा अर्थ ‘एखाद्याची मिळकत आणि त्यातून होणारा व्यय वजा करून शिल्लक रहाणार्‍या रकमेतून सामाजिक किंवा धार्मिक कार्याला केलेले साहाय्य’, असाही होतो.

प्रतिकूल परिस्थितीत घाबरून न जाता पुढील स्वयंसूचना देऊन आत्मबळ वाढवा !

‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, तसेच भीती वाटून अस्वस्थता येणे’, अशा प्रकारे स्वभावदोषांचे प्रकरटीकण होण्याची शक्यता असते. त्या प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीनुसार वासना (अपेक्षा करणे) या दोषावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न

प्रा. के.वि. बेलसरे लिखित ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय’ हा ग्रंथ वाचला. त्यामध्ये ‘वासना’ या विषयावर महाराजांनी केलेले मार्गदर्शन मी अभ्यासले. याचा मला व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेत उपयोग झाला.

आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी भगवंताने घेतलेली परीक्षा

कोणतीही वाईट परिस्थिती आली किंवा घटना घडली, तरी न घाबरता, सतत भगवंताच्या अनुसंधानात राहून तिचा स्वीकार केल्यास आत्मबळ मिळून त्या परिस्थितीला सहज सामोरे जाता येते.