भारतीय आणि चिनी बिंदूदाबन पद्धतींची तुलना

भारतात ५,००० वर्षांपूर्वीपासून असलेली बिंदूदाबन उपायपद्धत कालांतराने बौद्ध साधू आणि प्रवासी यांनी चीन आणि जपान या देशांत पोहोचवले.

शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’

शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आंतरिक अवयव कार्यान्वित करणे आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वास्थ्य सुधारणे, तसेच देहातील त्या त्या भागाशी संलग्न शक्तीबिंदूंवर दाब देणे, म्हणजे ‘बिंदूदाबन उपाय’ (अ‍ॅक्युप्रेशर).