हिंदु बांधवांनो, हिंदूंच्या संघटित शक्तीचा आविष्कार दाखवा!

राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी जागृती करण्यासाठी हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने प्रत्येक रविवारी एका समान उद्देशासाठी राष्ट्रीय स्तरावर आंदोलने केली जातात.

उरण येथील श्री. राघोबा सावळाराम ठाकूर (वय ८६ वर्षे) यांनी गाठली ६५ टक्के आध्यात्मिक पातळी !

१९.१२.२०१३ या दिवशी रायगडमधील वशेणी (उरण) येथील साधक श्री. राघोबा सावळाराम ठाकूर हे ८६ वर्षांचे आजोबा देवद आश्रमात आले होते. वृद्धावस्थेमुळे त्यांना नीट चालताही येत नव्हते.

श्रीमती उर्मिला रेडकर यांनी गाठली६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

देवद (पनवेल) येथील सनातन संकुल येथे रहाणार्‍या आणि देवद आश्रमातील उत्पादन विभागात सेवा करणार्‍या श्रीमती उर्मिला रेडकरकाकू (वय ६१ वर्षे) यांनी ६१ टक्के स्तर गाठला.

सनातनच्या ग्रंथ-निर्मितीच्या कार्यासाठी संकलकांची आवश्यकता !

अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार्‍या ४ सहस्र एवढ्या अध्यात्मशास्त्राविषयीच्या ग्रंथांचे लिखाण प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी संग्रहित केले आहे.

प्रभावी धर्मप्रसारासाठी सनातन ग्रंथालय उपक्रमाचे प्रायोजक बना !

सनातन संस्थेने सार्वजनिक ठिकाणी, उदा. देऊळ, रुग्णालय या ठिकाणी सनातन ग्रंथालय हा हिंदूंना धर्मशिक्षण देणारा नवीन उपक्रम चालू केला आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी विविध विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता !

सनातन धर्मातील अध्यात्मशास्त्राचा वैज्ञानिक परिभाषेत अभ्यास आणि ईश्‍वरप्राप्तीसाठी विविध योगमार्गांनुसार साधना करता येण्यासाठी आज भारतात एकही विद्यापीठ नाही. या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्थेकडून तक्षशीला, काशी, भोजशाला आदी प्राचीन विद्यापिठांच्या प्रमाणे एका मोठ्या जागेत सनातन अध्यात्म विश्‍वविद्यालय स्थापण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.

तामिळ भाषेतील सनातन पंचांग २०१४च्या अ‍ॅन्ड्रॉईड कार्यप्रणालीचे प्रकाशन

तामिळ भाषेतील सनातन पंचांग २०१४च्या अ‍ॅन्ड्रॉईड कार्यप्रणालीचे कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

(म्हणे) ‘मडगाव स्फोट प्रकरणात सनातन संस्थेला गोवण्यासाठी हस्तक्षेप केला नाही ! ‘

फोंडा, १७ जानेवारी – मडगाव स्फोटासंदर्भात गोवा पोलिसांनी व्यवस्थित चौकशी केली आहे. गृहमंत्री म्हणून जे माझ्यावर दायित्व होते, ते दायित्व मी त्या वेळी पूर्ण केले आहे.

(म्हणे) मडगाव स्फोटाची चौकशी पुन्हा गोवा पोलिसांनी करावी !

मडगाव – मडगाव स्फोट प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए) चौकशी करण्यास अपयशी ठरल्याने मडगाव स्फोटाची गोवा पोलिसांनी पुन्हा चौकशी करावी आणि या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी निवृत्त न्यायाधिशाचीही नेमणूक करावी, अशी मागणी सोशल डेमॉक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष झिआउल्ला रिकार्ती यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.