पूज्यपाद संतश्री आसारामबापूंच्या भक्तांचा सनातनला पाठिंबा

संतश्री आसारामजी समाज कल्याण आणि समाज परिवर्तन संस्थानाच्या वतीने बापूंचे सर्व भक्त आणि अनुयायी राष्ट्रानिर्मितीस वाहून घेतलेल्या सनातन संस्थेवर करण्यात येत असलेल्या टीकेचा तीव्र शब्दात विरोध करत आहोत.

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ विषारी प्रचार करते का ?

समाजात तेढ निर्माण करणे हा दैनिक सनातन प्रभातचा उद्देश नाही. कोणताही समाज असो त्याची निष्ठा या देशाशी असली पाहिजे, एवढेच सनातन प्रभातचे म्हणणे असते.

सनातन संस्थेवर बंदी नाही ! – लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा

सनातन संस्था ही आतंकवादी संघटना असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. गोव्यातील मागील काँग्रेस शासनाने या संस्थेवर बंदी घालण्यासाठी बनवलेल्या प्रस्तावातील आरोपांत चौकशीअंती तथ्य आढळून आलेले नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सनातनवर बंदी घालण्याची प्रसारमाध्यमांची अट्टाहासी मागणी पुन्हा एकदा फेटाळून लावली आणि सनातन संस्थेवर बंदी घालू शकत नाही, असा निर्वाळा दिला.

सनातनच्या कु. प्रियांका स्वामी यांच्या भ्रमणभाषवरील संपर्कामुळे वृत्तवाहिन्यांचे पितळ पडले उघडे !

कु. स्वामी यांनी सांगितले, मला समाजकार्याची आवड होती. मी सज्ञान आणि सुशिक्षित आहे. मला आश्रमात राहून पूर्णवेळ समाजकार्य करण्याची संधी मिळते. मी माझ्या पालकांशी भ्रमणभाषवरून संपर्कात असते. सनातन संस्थेत काहीही चुकीचे सांगितले जात नाही. तेथे अयोग्य काही चालत नाही.

धर्मद्रोह्यांनी पसरवलेल्या कलुषित दृष्टीकोनांमुळेच सनातनच्या विरोधात वादंग ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

अखिल भारतीय अंनिसचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम मानव किंवा डॉ. दाभोलकर हे रझा अकादमीच्या धर्मांधांनी महिला पोलिसांचे कपडे फाडले, तर त्यांना विचारत नाहीत. त्यांनी माध्यमांच्या ओबी व्हॅन पेटवल्या, तरी त्यांविषयी ब्रही काढला जात नाही; मात्र सनातन प्रभातमध्ये अत्याचारी पोलिसांना साधना करण्याची शिक्षा करा !, असे म्हटल्यावर त्याविषयी अनेक जणांकडून ओरड केली जाते.

धर्मनिष्ठ विचार असल्यामुळे सनातन संस्थेला सातत्याने लक्ष्य करणे थांबवा !

सनातन संस्था जे काही लिखाण करते, ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करते. भारतीय संविधानाच्या आधीन राहून योग्य ती टीका करण्यात चुकीचे काही नाही. सनातन संस्था किंवा हिंदू जर कट्टरतावादी असते, तर आज सनातनविषयी होत असलेल्या आरोपांची अशी चर्चा करता आली असती का ? सनातन संस्थेची विचारसरणी धर्मनिष्ठ असल्यामुळे प्रत्येक पुरोगाम्याची हत्या झाली की, त्याविषयी सनातन संस्थेकडे बोट दाखवले जाते. हे थांबलेच पाहिजे.

पोलीस अन्वेषणाविषयी न्यायालयाने ओढलेले ताशेरे दृष्टीआड करून चालणार नाही !

सनातनचा साधक समीर गायकवाड प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडे तांत्रिक पुरावे असल्याचे सांगितले होते; त्या आधारावर त्याला अटक केली होती; मात्र आतापर्यंत तपास जैसे थे असल्याचा ताशेरा न्यायालयानेे ओढला आहे, तो दृष्टीआड करून चालणार नाही. पोलिसांचे हे तांत्रिक पुरावे कुठे आहेत, असा प्रश्‍न पडतो, असा निष्कर्ष एबीपी माझा या वृत्तवाहिनीने २९ सप्टेंबर २०१५ या दिवशी झालेल्या चर्चेत काढला.

सनातन संस्थेचे कार्य आध्यात्मिक असून संस्था हिंसेचा पुरस्कार करत नाही ! – अधिवक्ता रामदास केसरकर, मानद विधी सल्लागार, सनातन संस्था

गेली १६ वर्षे सनातन संस्था आठवड्याचे सत्संग, संस्कारवर्ग, ग्रंथ प्रकाशन या माध्यमातून आध्यात्मिक कार्य करत आहे. त्यामुळे लाखो लोकांनी साधना करण्यास प्रारंभ केला. साधना करून अनेक लोक सुखी आणि तणावमुक्त झाले आहेत.

संमोहनाद्वारे मानवी बॉम्बचा शोध लावल्याविषयी प्रा. मानव यांना नोबेल द्यावे !- सनातन संस्था

प्रा. श्याम मानव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्था संमोहनाद्वारे मानवी बॉम्ब बनवत असून महाराष्ट्राचे अफगाणिस्तान होण्याची शक्यता वर्तवली. यावर प्रा. श्याम मानव यांना या संशोधन केल्याविषयी नोबेल पारितोषिक मिळायला हरकत नसावी, असा टोला सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी प्रसिद्धी पत्रकातून लगावला आहे.

हिंदुत्ववादी अाणि हिंदु संघटना सनातन संस्थेच्या बंदीची मागणी करणार्‍यांच्या निषेध !

सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणार्‍या काँग्रेस आणि साम्यवादी यांचा शिवसेनेच्या तमिळनाडू शाखेकडून निषेध, विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदुत्ववाद्यांचे बंदीची मागणी करणार्‍यांच्या निषेधार्थ आंदोलन, नंदुरबार येथे बंदीच्या मागणीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन…