एखाद्या सदस्याच्या चुकीमुळे सनातन संस्थेवर बंदी घालणे अयोग्य ! – मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

संघटनेचा एक सदस्य चूक करू शकतो. एक सदस्य एका संघटनेशी किंवा अनेक संघटनांशी संबंधित असू शकतो, असे सांगत सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयीची शक्यता मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पूर्णपणे फेटाळली.

एका राज्यातील एका सेवाकेंद्रात सनातनच्या साधकांची पोलिसांकडून चौकशी

एका राज्यातील एका सेवाकेंद्रात नुकतीच ४ पोलिसांनी येऊन साधकांकडे चौकशी केली. या वेळी साधक आणि पोलीस यांच्यात झालेले संभाषण येथे देत आहोत.

सनातन संस्थेवर राजकीय दबावाखाली बंदी घालणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सनातन संस्थेवर बंदी घालायची अथवा नाही, याचा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

समीर गायकवाड यांना ३ दिवस पोलीस कोठडी !

पोलिसांच्या वतीने ७ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी केवळ ३ दिवस म्हणजे २६ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भुसावळ येथे हिंदुत्ववाद्यांकडून उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन !

भुसावळ – येथे उपविभागीय अधिकार्‍यांना सनातन संस्थेवर बंदी आणू नये, तसेच गणेशमूर्तीदान होऊ नये आणि कृत्रिम हौद बांधू नयेत यासाठी हिंदुत्ववाद्यांनी निवेदने दिली.

पुरोगाम्यांच्या पत्रावर साहाय्यक आयुक्तांची सनातनच्या प्रदर्शनास नोटीस !

१८ सप्टेंबर या दिवशी पुरोगामी संघटनांनी सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन रहित करण्याच्या संदर्भात सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले. या निवेदनावर…

सनातन संस्थेच्या बंदीविषयी पुरेसे पुरावे नव्हते ! – आर्.के. सिंह, माजी गृहसचिव

देशाच्या गृह विभागाचे माजी गृहसचिव आणि सध्याचे भाजपचे खासदार श्री. आर्.के. सिंह यांनी सनातन संस्थेच्या बंदीविषयी तत्कालिन महाराष्ट्र शासनाने पुरेसे पुरावे सादर केले नव्हते, असे सांगितले. श्री. सिंह यांनीच सदर प्रस्ताव नाकारल्याविषयी सांगितले.

निखिल वागळे यांची तळी उचलून सनातनला दोषी ठरवू पहाणार्‍या न्यूज एक्स वृत्तवाहिनीच्या संपादकांची पीत पत्रकारिता उघड !

हिंदुद्रोही पत्रकार निखिल वागळे यांनी सनातन संस्था मला वर्ष २०११ पासून धमक्या देत होती, असा कांगावा करण्यास आरंभ केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर न्यूज एक्स या इंग्रजी वृत्तवाहिनीने रात्री ९ वाजता चर्चासत्र आयोजित केले होते…

म्हणे, ‘तीनही हत्यांमागे सनातनचा हात !’

पुरोगामी संघटनांचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे निवेदन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव सुभाष लांडे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

श्यामसुंदर सोनार आणि निखिल वागळे यांना सनातनने धमकी दिल्याचा आरोप ही स्टंटबाजी !

श्यामसुंदर सोनार आणि निखिल वागळे यांना सनातन संस्थेने धमकी दिल्याविषयी मुंबई प्रेस क्लबकडे तक्रार करण्यात आल्याचे वृत्त २२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झाले आहे. त्याविषयी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी एक पत्र प्रेस क्लबच्या अध्यक्षांना पाठवले आहे. त्या पत्रात म्हटले आहे…