मारेकरी असल्याचा बेछूट आरोप करणारे सबनीस यांना न्यायालयात खेचणार ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

ते ट्विट वैयक्तिक आहे. सनातन संस्थेचा यात काही संबंध नाही. माझ्यासारख्या अधिवक्त्याला लक्ष्य करून यात सनातन संस्थेला ओढण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट आहे.

२६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथे जाऊन धर्मद्रोही स्त्रियांना चौथर्‍यावर चढण्यापासून रोखावे !

२६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथे धर्मद्रोही स्त्रियांना शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्यापासून अडवण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी त्या ठिकाणी पोहोचणे, ही भक्तीच आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले.

खोटी वृत्ते देऊन सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याविषयी ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीस सनातन संस्थेची नोटीस

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी ‘तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला श्रीपाल सबनीस’, असे ट्विट केले होते. या ट्वीटचा सनातन संस्थेशी काही संबंध नसतांना ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरून सनातन संस्थेची अपकीर्ती करणारा मजकूर प्रसारित करण्यात आला.

(म्हणे) हिंसेला उघड प्रोत्साहन देणार्‍या सनातनवर कारवाई करा ! – डॉ. भारत पाटणकर

पुरोगामीवाल्यांची सनातनविरोधी तीच ती गरळओक चालूच ! (म्हणे) सनातन आणि अभिनव भारत या दोन संघटना हिंसेला प्रोत्साहन देत आहेत. हिंसेला जाहीरपणे प्रोत्साहन देणार्‍यांवर कारवाई करा…

(म्हणे) सनातनचे अधिवक्ता पुनाळेकरांना अटक करा !

श्री. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करून वाद ओढवून घेतला. त्यानंतर श्री. संजीव पुनाळेकर यांनी त्यांना मॉर्निंग वॉकला जाण्याचा सल्ला देणारे ट्विट केले.

शनि शिंगणापूरच्या रूढी-परंपरांचे जतन करण्यासाठी महिला आणि ग्रामस्थ यांनी वेळोवेळी घेतलेला पुढाकार !

देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळावर दोन महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने श्री शनैश्‍वर देवस्थानचा इतिहास, पूर्वीचे निष्ठावंत विश्‍वस्त आणि राजकीय हस्तक्षेपामुळे झालेली हानी यांसंदर्भात नगर येथील मढी देवस्थानचे विश्‍वस्त श्री. मिलिंद सदाशिव चवंडके यांनी लिहिलेला लेख…

पेण येथे सनातन संस्थेच्या वतीने समर्थ पादुकांचे पूजन !

समर्थ रामदासस्वामी यांच्या चरणपादुकांचे १ जानेवारी या दिवशी पेण येथील श्री रामेश्‍वर मंदिरात शुभागमन झाले. सनातन संस्थेच्या वतीने पादुकांच्या पालखीचे स्वागत तसेच पादुकांचे विधीवत पूजन करून दर्शन घेण्हीयात आले.

गुन्हा सिद्ध झालेला असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर काही राजकीय पक्ष यांच्यावर बंदी का नको ? – पू. (कु.) स्वाती खाडये

हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रारंभी पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला…

(म्हणे) देशातील अनेक आतंकवादी कारवायांत रा.स्व.संघ आणि सनातन यांचा थेट सहभाग !

देशाला हिंदु नव्हे, तर ब्राह्मणी आतंकवादाचा धोका आहे. देशातील अनेक आतंकवादी कारवायामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सनातन यांचा थेटपणे सहभाग आहे. …, अशी मुक्ताफळे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी ३ जानेवारी या दिवशी येथे उधळली.

इंग्रजीच्या तुलनेत मराठी खरी ज्ञानभाषा ! – प्रा. अनिल गोरे (मराठीकाका)

१९८५ पर्यंत भारतातील शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर झळकत होता. जसजसे इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे खूळ वाढत गेले, त्या प्रमाणात महाराष्ट्राने वरून खालच्या दिशेने झेप घेतली.