पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या गजरांत, टाळ-मृदंगाच्या साथीने अनुमाने दोनशे मैल (३२२ कि.मी.) चालत जातात. अशा वेळी त्यांना ना थकवा असतो, ना कशाची काळजी असते !

पांडुरंग आणि एकादशी यांचे माहात्म्य !

आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्‍या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.

आषाढी एकादशी – पंढरपूरला होणारा भागवतभक्तांचा महासंगम

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधक गटाने एका पंढरीच्या वारीचे आणि त्यात होणा-या रिंगणाचे चित्रीकरण केले.

श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी !

संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत ‘वारी’ हा शब्द ‘फेरा’ किंवा ‘खेप’ या अर्थाने वापरला आहे. ‘ही वारी कधी चालू झाली ?’, याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत; मात्र ‘ज्ञानेश्‍वर माऊलींनी ‘वारी’ची महती अधिक प्रमाणात वाढवली’, असे म्हणता येईल.

भावभक्तीची अनुभूती देणारी पंढरपूरची वारी !

वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्‍वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी !

डोळे भरून पहावा, असा पंढरपुरातील परंपरागत श्री पांडुरंग रथोत्सव सोहळा !

आजचे पंढरपूर इसवी सन् १७१५ नंतरच्या पंरपरा जपणारे आहे. त्यापूर्वी पंढरपूर फार काळ सुलतानी अंमलाखाली होते. त्यामुळे प्रथा-परंपरा यांचा लोप झालेला होता; पंरतु ‘रथस्थ विठ्ठल दृष्टवा, पुनर्जन्म न विद्यते’ असा उल्लेख पांडुरंग महात्म्यात असल्यामुळे पूर्वीही रथोत्सव होता, हे समजते.

पंढरपूरची वारी: भावभक्तीचा उत्कट सोहळा !

प्रत्येकाचे कल्याण चिंतणे, कार्यात भगवंताला पहाणे, धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भागवतधर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तीमय जीवन असते !
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरी भरलेल्या आनंदयात्रेत सहभागी होऊन विठुरायला भेटूया. वारीसमवेत प्रत्येक जिवाच्या आयुष्याची वारीही भक्तीमय होऊ दे, ही प्रार्थना !

एकादशी व्रत

केवळ पुण्यसंचय व्हावा, या सद्हेतूने एकादशीकडे पहाणे अयोग्य आहे. एकादशी व्रताचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत अन् होणार आहेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक मासात दोन एकादशी येतात.

एकादशी (हरिदिनी)

एकादशी या व्रताचे महत्त्व आणि एकादशी व्रताचे प्रकार यांविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.