हिंदु नारींनो, हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कृतीशील व्हा !

हिंदु नारींनो, आपल्या देशावर आपले (धर्मप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी यांचे) राज्य आल्यासच आपल्या देवा-धर्माचे, संस्कृतीचे, इतिहासाचे, भाषेचे, अस्मितेचे, आबाल-वृद्धांचे आणि स्त्रियांचे रक्षण अन् पालन होणार आहे, हे परम सत्य जाणा !

अनेक दैवी गुणांमुळे प्रपंचाचा डोलारा सहजतेने सांभाळणारी घराची स्वामिनी !

देवाच्या शासनात चार महत्त्वाची खाती स्त्रीदेवतांकडेच सदासाठी देण्यात आली आहेत आणि त्या आपापली खाती समर्थपणे आणि उत्तम रितीने सांभाळत आहेत. आपल्या शक्तीने दुष्टांचा संहार करण्याचे संरक्षण खाते कालिकादेवीकडे, अर्थ खाते श्री लक्ष्मीदेवीकडे, शिक्षण खाते सरस्वतीकडे, तर अन्न खाते अन्नपूर्णादेवीकडे आहे. या देवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे दिला आहे; म्हणून ती सारे घर आणि प्रपंच समर्थपणे सांभाळू शकते, तसेच स्वसामर्थ्यावर तोलून धरू शकते.

स्त्री आणि तिचे कौटुंबिक जीवनातील स्थान

कामवासना ही नैसर्गिक प्रेरणा असते. ती प्रजोत्पादनासाठी असते आणि तिच्यामुळे वंशपरंपरा टिकून रहाते. माझ्या कामवासनेची तृप्ती तर व्हायलाच हवी; परंतु संततीला सांभाळण्याचे दायित्व माझे नाही, हे म्हणणे निसर्गविरोधी आहे.

अविभक्त हिंदु कुटुंबात ज्येष्ठ मुलगी ही कर्ता होऊ शकते का ?

स्त्रीला वारसा संपत्तीतील भाग वडील, पती आणि पुत्र या सर्वांकडून मिळतो, हे भारतीय शास्त्रांचे आणि भारतीय कायद्याचे विशेष महत्त्व आहे.