श्री गणेशाची विशेष स्थाने आणि त्यांचे माहात्म्य !

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील परंपरांचे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गणेशोत्सवात अग्रपूजेचा मान ‘कसबा गणपति’ला लाभला आहे.

सिक्कीममधील ‘गणेश टोक’ या जागृत मंदिराचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दर्शन घेतले !

वर्ष १९५२ मध्ये भारत सरकारचे एक उच्चपदस्य अधिकारी श्री. अप्पाजी पंत जे मूळचे महाराष्ट्रातील होते, त्यांची सिक्कीम राज्यात नियुक्ती झाली होती. श्री. अप्पाजी पंत हे धार्मिक प्रवृत्तीचे आणि देवाचे भक्त होते.

भगवान शिवाला काशीक्षेत्री वास्तव्य करता यावे, यासाठी कार्य करून काशीक्षेत्रीच विराजमान झालेला श्री धुंडीराज विनायक !

‘काशी (उत्तरप्रदेश) येथे सहस्रो मंदिरे आहेत. त्यात गणेशाची ५६ मंदिरे आहेत. या ५६ गणेशांमध्ये श्री धुंडीराज विनायक विशेष आहे. असे म्हटले जाते की, काशीची परिक्रमा केल्यावर श्री धुंडीराज विनायकाचे दर्शन घ्यावे.

तमिळनाडूतील प्रमुख गणपतींपैकी पहिले स्वयंभू श्री गजानन मंदिर !

‘पिळ्ळैयारपट्टी (‘पिळ्ळैयार’ म्हणजे तमिळ भाषेत श्री गजानन) येथील स्वयंभू गजाननाचे मंदिर हे तमिळनाडूमधील गजाननाच्या प्रमुख तीन मंदिरांपैकी पहिले मंदिर आहे.

कलियुगातील दोष नष्ट करण्यासाठी तपस्या करणार्‍या ऋषिगणांची विघ्ने हरण करणारा इडगुंजी (कर्नाटक) येथील श्री महागणपति !

इडगुंजी मंदिरातील मुख्य मूर्तीही चौथ्या किंवा पाचव्या शतकातील आहे. ही द्विभुजा श्री गणेशमूर्ती पाषाणावर उभी आहे. श्री गणेशाच्या उजव्या हातात कमळ आहे आणि दुसर्‍या हातात मोदक आहे.

कुंभासुराचा वध करण्यासाठी भीमाला तलवार दिलेला कर्नाटक राज्यातील कुंभाशी (जिल्हा उडुपी) येथील श्री महागणपति !

कर्नाटक राज्यात उडुपी जिल्ह्यात कुंभाशी येथे श्री आनेगुड्डे महागणपति मंदिर आहे. येथील श्री महागणपतीची मूर्ती अखंड पाषाणातून बनवलेली १२ फूट उंचीची आहे.

श्रीकृष्णाचे क्षेत्र असलेल्या गुजरातमधील प्राचीन गणपति मंदिराचे वैशिष्ट्य आणि महत्त्व !

१९.३.२०१९ या दिवशी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांनी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात येणारे अडथळे दूर होण्यासाठी श्रीकृष्णाचे क्षेत्र असलेल्या गुजरात राज्यातील राजधानीजवळच्या प्राचीन गणपति मंदिरात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जावे.

२०० वर्षांचा इतिहास लाभलेला अन् नगर शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपति !

नगर शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील श्री सिद्धीविनायक विशाल गणपतीचे मंदिर अत्यंत जागृत तीर्थक्षेत्र असून या मंदिराला २०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवता आणि मंदिर यांची ख्याती दूरपर्यंत आहे.

थेऊर (जिल्हा पुणे) येथील गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या उपासनेचे स्थान !

१४ व्या शतकातील महान गणेशभक्त मोरया गोसावी हे त्यांच्या उत्कट गणेशभक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मोरगांव येथे गणेशाची भक्ती केली.

आव्हाणे बुद्रूक (जिल्हा नगर) येथील निद्रावस्थेतील दक्षिणोत्तर श्री गणेशमूर्ती !

नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावापासून १७ किलोमीटर अंतरावर ‘आव्हाणे बुद्रूक’ नावाचे गाव आहे. अवनी नदीच्या तीरावर असणार्‍या या गावातील श्री गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. येथील श्री गणेशमूर्ती निद्रावस्थेत विराजमान असून ती दक्षिणोत्तर आहे.