मलेशिया येथील तीन सिद्धांची समाधीस्थाने

‘२६.१.२०१९ या दिवशी पू. (डॉ.)ॐ उलगनाथन्जी यांनी भ्रमणभाषवरून सांगितले, ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ६ ते १३.३.२०१९ या कालावधीत मलेशिया येथे जाऊन तेथील सिद्धांची समाधीस्थाने शोधून काढावीत.’

मलेशियाच्या राजवटीवर असलेला भारतीय (हिंदु) संस्कृतीचा प्रभाव !

ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास दक्षिण-पूर्व आशिया भागावर प्राचीन भारतीय संस्कृतीचा पगडा होता. त्यामुळे थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपीन्स, कंबोडिया, व्हिएतनाम यांसारखी असंख्य अधिराज्ये समृद्ध झाली

मलेशियातील बटू गुहेत असलेले कार्तिकेयाचे विश्‍वप्रसिद्ध जागृत मंदिर !

प्राचीन काळी ज्याला ‘मलय द्वीप’ म्हटले जात होते, तो म्हणजे आताचा मलेशिया देश. मलेशिया हा अनेक द्विपांचा समुच्चय आहे. मलय भाषेत अनेक संस्कृत शब्दांचा उपयोग केला जातो. मलय साहित्यात ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांचा संबंध दिसून येतो.