सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने ईश्‍वरच खरा दयाळू, अहिंसावादी आणि कृपाळू असणे

ईश्‍वरच खरा दयाळू आणि क्षमाशील आहे. माणसाने पुष्कळ पापे आणि कुकर्मे केली, तरी ईश्‍वर त्याला पुनःपुन्हा जन्म देऊन मोक्षप्राप्तीची संधी देतो. तो सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने दयावान, अहिंसावादी आणि कृपाळू आहे.

संस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे

पिढ्यान्पिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो. तेथपर्यंत राक्षसीवृत्ती बोकाळून विघटनकारी कृत्ये सुरू होतात. त्याचे परिणाम समाजाला आणि राष्ट्राला भोगावे लागतात. आज भारताचे असेच झाले आहे. सुसंस्कार नाहीसे झाले आहेत … Read more

सगुणाची पूजा करतांना आपल्यातील भगवंत प्रसन्न व्हायला हवा !

सगुणाची पूजा, म्हणजे आपल्यातील निर्गुण ईश्‍वराला सगुणात आणून त्याची पूजा करत आहोत, असा भाव ठेवला, तर ती पूजा आत्मीयतेने होऊन आपल्यातील भगवंत प्रसन्न होतो.

मायेतील ब्रह्माविषयी कृतज्ञ असणे आवश्यक !

आपण मायेतील ब्रह्माला जवळ करत नाही, तर मायेशी संवाद साधतो. आपण मायेच्या मूळ रूपाला जाणत नाही, उदा. आश्रमातील जांभळे खातांना ती ज्याच्यामुळे मिळाली त्याची जाणीव आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. ज्या झाडाने जांभळे दिली त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, तर झाड आणि जांभळे काढून देणारा हे दोघेही प्रसन्न होतील.

कार्य सत्य नसून कार्याचा कर्ता करविता ईश्‍वरच खरा सत्य होय !

कार्याचे व्यक्त स्वरूप आपल्यात दृष्यमान होत असते. त्यालाच आपण सत्य समजण्याची चूक करतो. प्रत्यक्षात कार्याचा कर्ता करविता (मन आणि ईश्‍वर) अव्यक्त असून तोच खरा सत्य असतो. अशा प्रकारे असत्याला सत्य मानल्याने सूक्ष्मातील ईश्‍वराशी आपले अनुसंधान रहात नाही. वास्तविक अव्यक्तच श्रेष्ठ असते.

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता अंतरात्म्याकडे लक्ष देणे आवश्यक असणे

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्‍या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे.

गुरुकृपायोगाद्वारे साधना करून स्वतःमध्ये पालट घडवून आणा आणि गुरुकृपेने येणार्‍या कोणत्याही कठीण परिस्थितीला सामर्थ्याने सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

दैनिक सनातन प्रभातच्या वाचकांसाठी प.पू. पांडे महाराज यांचा संदेश ! दैनिक सनातन प्रभातच्या आदरणीय वाचकांना, सप्रेम नमस्कार. मानवाच्या हातून भूतकाळात घडलेल्या वाईट कर्मांचा परिणाम, म्हणजे आजची भयानक वर्तमान स्थिती आहे, जी आपण प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातमधून वाचत आहोत. भारतीय संस्कृती आणि संत-महात्मे यांनी मानवाला भौतिक अन् पारमार्थिक दृष्टीने समर्थ होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याप्रमाणे … Read more

चैतन्य रूपात कार्य करणारी प्रभूशक्ती

‘आपल्या भारतामध्ये नदी, पर्वत, भूमी असे जे वातावरण आहे, ते सात्त्विकतेने, अध्यात्माने प्रभावित आहे, चैतन्याने युक्त आहे. त्याला नाहिसे करण्याचे आपणच ठरवलेले आहे, म्हणजे स्वतःचा आत्मघात करत आहोत. आपल्या देशातील नद्या या केवळ नद्या नाहीत. नदी म्हणजे चैतन्यरूपात कार्य करणारी प्रभुशक्ती आहे. हिमालय केवळ पर्वत नाही, तर ती देवाची शक्ती आहे.’ – प.पू. परशराम पांडे, … Read more

स्वार्थांध राजकीय नेते

‘आपण आपल्यातच गुंग आहोत. जनता स्वतःतच गुंग आहे. बहुतांश आमदार-खासदार स्वार्थाने आंधळे झाले आहेत. त्यांना देशाचे काही पडले नाही. त्यांना केवळ खुुुर्ची हवी आहे. अशा नेत्यांना दिसेल, तेथे खडसावा. असे नेते स्वतःही मरतील आणि आपल्या सर्वांना घेऊन मरतील. अधर्माचरणामुळे सध्याच्या हिंदूंची स्थिती सहिष्णुतेच्या अतिरेकामुळे सर्वांत मूढतेची झाली आहे. त्यामुळे ते धर्मांधांच्या अतिक्रमणापुढे नमते घेत आहेत. … Read more

श्रीकृष्णाचे सारथ्य

कृष्णाने गीतेच्या ११ व्या अध्यायात सांगितलेले आहे. ‘हे पहा, युद्ध झालेलेच आहे. फळ मिळालेले आहे.’ आरंभीच त्याने इतिश्री सांगून टाकली, तरीपण युद्ध करतांना आलेल्या अडचणींना तोंड देण्यासाठी तो सारथी झाला. आपल्याला योगेश्‍वराचा (प.पू. डॉक्टरांचा) आधार आहे. त्यामुळे आपल्याला भिण्याचे कारण नाही. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र येणार आहे’, हे सांगूनच टाकले आहे, तरीपण येणार्‍या काळासाठी तोंड देण्याला … Read more