कृतज्ञता व्यक्त करणे !

‘जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून सतत कृतज्ञता व्यक्त करावी. कृतज्ञता व्यक्त केल्याने ‘भगवंतच सर्वकाही करत आहे’, हा संस्कार अंतर्मनावर होऊन अहंभाव अल्प होण्यास साहाय्य होते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

मनमोकळेपणा आणि आध्यात्मिक मित्र

‘मनमोकळेपणाने मनातील विचार त्वरित उत्तरदायी साधक किंवा संबंधितांना सांगावेत. शब्दांत मांडता येत नसल्यास विचार लिहून उत्तरदायी साधकांना द्यावेत. आपण आपल्या मनातील जे विचार इतरांना सांगू शकत नाही, अशा विचारांचा निचरा होऊन मन शांत होण्यासाठी ‘आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण’ असल्यास त्यांच्याशी बोलावे. त्यामुळे मनावरील ताण अल्प होतो.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. … Read more

आत्मनिवेदन

‘आत्मनिवेदनाच्या माध्यमातून मनातील सर्व विचार भगवंताला सांगण्याची सवय लावावी. आत्मनिवेदनामुळे मन हलके होण्याच्या समवेत ईश्‍वराशी अनुसंधानही साधले जाते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

भगवंताची लीला अनुभवून कृतज्ञता व्यक्त करणे

‘मी काहीही खाल्ले, तरी त्याचे रक्त बनते, ही किमया कोण करू शकतो ? माझा प्रत्येक श्‍वास कुणामुळे अखंड चालू आहे ? मोठ्या अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून माझे प्रत्येक क्षणाला कोण रक्षण करतो ?’, यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरे शोधल्यास भगवंताची लीला अनुभवता येऊ शकते. यांसाठी दिवसातून मी किती वेळा कृतज्ञता व्यक्त करतो ?’, याचाही विचार करावा.’ – (सद्गुरु) … Read more

मनमोकळेपणा

‘आपल्या मनातील विचार मोकळेपणाने इतरांना सांगितल्यास विचारांमुळे आपल्याला आलेला ताण अल्प होतो. बर्‍याच वेळा मनात येणारे विचार योग्य कि अयोग्य, हे न कळल्याने अस्वस्थता येते. अशा वेळी ते विचार उत्तरदायी साधकांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. असे केल्याने अनावश्यक विचारात वाया जाणारा वेळ आणि ऊर्जा वाचते. विचारांवर वेळीच मार्ग न काढल्यास मनोदेहावरील रज-तमाचे आवरण वाढून अनिष्ट … Read more

व्यष्टी साधनेचा पाया भक्कम हवा !

‘व्यष्टी साधना चांगली असेल, तर आपली क्षमता वाढते, सकारात्मकता निर्माण होते आणि समष्टी साधना करण्यासाठी ऊर्जा मिळते. व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधनेकडे लक्ष देणार्‍या साधकांवर गुरुकृपेचा ओघ अधिक असतो.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)