सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुढीपाडव्यानिमित्त संदेश

‘गुढीपाडवा म्हणजे युगादि तिथी ! साडेतीन मुहुर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेल्या या दिवशी नवीन कार्यांचा शुभारंभ केला जातो. सध्या भारतात निधर्मी राज्यव्यवस्थेमुळे सर्वत्र धर्मग्लानी आल्याचे आपण अनुभवत आहोत. सनातन धर्मासह धर्मसंस्कृती, वैदिक कालगणना, संस्कृत, गाय, गंगा, मंदिरे आदी हिंदु धर्माचे मानबिंदू संकटात आहेत. अशा परिस्थितीत संस्कृतीप्रेमींकडून ‘३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे, तर गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करा’, असे … Read more

साधना करण्यासंदर्भातील स्वेच्छा ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असणे !

साधनेत सांगतात, स्वेच्छा नको. प्रथम सर्व परेच्छेने करण्यास शिका. नंतर ईश्‍वरेच्छा काय आहे ते कळेल आणि त्यानुसार सर्व करा. असे जरी असले, तरी साधना करण्यासाठी नोकरीच काय, तर घरदारही सोडण्याचा विचार करण्याची स्वेच्छा झाली, तरी ती योग्यच आहे. ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.११.२०१६)

साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्‍वरेच्छेने करायचे, असे करता…

साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्‍वरेच्छेने करायचे, असे करता यायला लागले की, ईश्‍वरप्राप्ती होते. याउलट व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वेच्छेने वागणारे झपाट्याने अधोगतीला जातात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१०.२०१६)

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७० वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.११.२०१६)

बहुतेक संतांचे आणि संप्रदायांचे कार्य बुद्धीगम्य असते, तर सनातनचे कार्य…

बहुतेक संतांचे आणि संप्रदायांचे कार्य बुद्धीगम्य असते, तर सनातनचे कार्य बुद्धीअगम्य, म्हणजे बुद्धीपलिकडील, सूक्ष्म स्तरावरील असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अध्यात्मातील विविध पातळ्यांना होणार्‍या त्रासाचे प्रधान स्वरूप, त्रासाचे प्रमाण आणि त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रमाण

आध्यात्मिक पातळी अध्यात्मातील विविध पातळ्यांना होणार्‍या त्रासाचे प्रधान स्वरूप, त्रासाचे प्रमाण आणि त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रमाण : सनातनचे साधक आणि संत तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करत समष्टी साधना करत असतांना त्यांना वाईट शक्तींचा त्रास का होतो ?, असा प्रश्‍न काही जणांच्या मनात निर्माण होतो. त्याचे उत्तर पुढील तक्त्यावरून लक्षात येईल. … Read more

माझे कार्य अधिक प्रमाणात सूक्ष्मातील असल्यामुळे इतर संतांप्रमाणे माझे नाव…

माझे कार्य अधिक प्रमाणात सूक्ष्मातील असल्यामुळे इतर संतांप्रमाणे माझे नाव हिंदूंमध्ये मोठे झाले नाही; पण सूक्ष्माचे अभ्यासक, सूक्ष्म जाणणारे संत आणि महर्षी यांच्यापर्यंत माझे नाव पोचले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनो, महर्षींनी प.पू. डॉक्टरांना श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले…

साधकांनो, महर्षींनी प.पू. डॉक्टरांना श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले असण्याचा अर्थ लक्षात घ्या ! : सप्तर्षी जीवनाडीतील मजकूर सांगणार्‍या महर्षींनी मला श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले आहे. साधकांना ही अपूर्व गोष्ट वाटेल. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, काही संतांना अनंत श्री, असे संबोधतात. त्यांच्या मानाने मी कोठेच नाही, हे लक्षात घ्या ! – … Read more

विविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे कारण

विविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे कारण : विविध नाड्या आणि संहिता यांत विविध ऋषींनी सांगितलेली माहिती असते. नाडी आणि संहिता यांचे वाचन करणार्‍यांकडे येणारे बहुतेक सर्वच सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍न विचारतात आणि त्यांना ऋषींकडून उत्तरही मिळते. त्यासंदर्भात मला वाटायचे, ऋषी एवढे ज्ञानी असूनही सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍नांची उत्तरे का देतात … Read more

कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे…

कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे प.पू. डॉक्टर, तर कुठे युगानुयुगे कार्य करणारा ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी ! : हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची स्थापना होणार, याची खात्री अनेक संत आणि नाडी भविष्य सांगणारे ऋषी यांनी मला दिली आहे. त्यामुळे आता करण्यासारखे काही कार्य उरले नसल्याने मला पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा … Read more