ऋषींच्या सांगण्याप्रमाणे देह उभा चिरून देत असतांना त्याग सत्कारणी लागल्याने राजाच्या डोळ्यांत आनंदाश्रू येणे

‘एक राजा त्यागासाठी प्रसिद्ध होता. एकदा त्याची परीक्षा घेण्यासाठी एक ऋषी त्याच्याकडे गेले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझे शरीर उभे चिरून त्यातील उभा भाग मला दे; परंतु तू खरा त्यागी असशील, तर तुझ्या डोळ्यांत दुःखाश्रू येता कामा नयेत.’’ राजाचे शरीर उभे चिरण्यास आरंभ झाला. तेव्हा राजाच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझा त्याग … Read more