फरिदाबाद येथील सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यातील जिज्ञासूंचा उल्लेखनीय प्रतिसाद !

१. सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात
सर्वतोपरी 
साहाय्य करणारे श्री. पवन बंसलजी !

फरिदाबाद येथील रामलीलेचे अध्यक्ष श्री. पवन बंसलजी यांनी सनातन संस्थेच्या प्रदर्शनासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी हिंदी मासिक सनातन प्रभातच्या सत्यकथन विशेषांकाचेेही प्रायोजक केले, तसेच प्रदर्शनस्थळावर साधकांना काही अडचण येऊ नये, याकडे त्यांनी पूर्ण लक्ष दिले. श्री. पवन बंसलजी यांच्या मोठ्या भावाच्या कु. निकुंज बंसल आणि कु. माधव बंसल या मुलांनीही ग्रंथप्रदर्शनावर साधकांना साहाय्य केले.

 

२. सनातन पंचांगाचे १०० प्रायोजक बनवणारे श्री. कृष्णा बंसलजी !

श्री. कृष्णा बंसलजी (श्री. पवन बंसलजी यांचे मोठे भाऊ) यांनी १०० सनातन पंचांगांचे प्रायोजक केले आणि शाळांमध्येही फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन करूया, असे सांगितले.

– श्री. सुरेश मुंजाल आणि श्री. कार्तिक साळुंके, देहली (ऑक्टोबर २०१५)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’