प्रतिदिन दुर्गा सप्तशती पोथीतील देवीकवच म्हणा !

साधकांना सूचना

आपत्कालात सर्व अवयवांचे रक्षण होण्यासाठी प्रतिदिन सकाळी देवीकवच म्हणावे !, असे महान दत्तयोगी प.पू. सदानंदस्वामींनी प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून साधकांना सांगणे

पुण्यातील महान संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून साडे तीन सहस्र वर्षांपूर्वीचे महायोगी श्री सद्गुरु सदानंदस्वामी बोलतात आणि ते या गुरुवाणीच्या माध्यमातून भक्तांना वेळोवेळी संदेशही देत असतात. हल्लीच त्यांची गुरुवाणी ऐकण्याचे सद्भाग्य आम्हाला प्राप्त झाले. त्यांना साधकांच्या आरोग्याविषयी प्रश्‍न विचारला असता, ते म्हणाले, आता हा पृथ्वीवरील अनाचार वाढतच जाणार आहे. यामध्ये आसुरी शक्तींच्या आक्रमणालाही आपल्याला सामोरे जावे लागेल. आपत्कालात देहाचे रक्षण होण्यासाठी, तसेच अनेक व्याधींपासून (हाडेदुखी, स्नायूदुखी, अनेक दुर्धर आजार, रक्तव्याधी) मुक्त होण्यासाठी साधकांनी प्रतिदिन दुर्गा सप्तशतीमधील चण्डिकवच (देवीकवच) म्हणणे आवश्यक आहे. यामुळे देहाभोवती अभेद्य असे शक्तीकवच निर्माण होण्यास साहाय्य होईल.

(दुर्गा सप्तशती या पोथीमध्ये देवीकवच आहे. यालाच चण्डिकवच म्हणतात. साधारणतः पान क्रमांक ५१ पासून याची सुरुवात होते आणि शेवट पान क्रमांक ६० वर होतो. याचा आरंभ आणि शेवट असा आहे – अथ चण्डिकवचम् ॥ श्री गणेशाय नमः……..वाराहपुराणे हरिहरब्रह्मविरचितं देव्यां कवचम् ॥ – संकलक)

दुर्गा सप्तशतीमधील चण्डिकवच (देवीकवच) या स्तोत्राचा आॅडिआे येथे एेका –

Audio Download

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (३०.११.२०१५)