नैसर्गिक पद्धतीने लावलेल्या रताळ्याच्या एका कोंबापासून ३ मासांत २ किलोहून जास्त रताळी मिळणे

Article also available in :

‘एप्रिल २०२२ मध्ये घरी पेठेतून काही रताळी आणली होती. त्यातील एका रताळ्याला लहानसा कोंब आला होता. हा कोंब कापून मी मातीत खुपसून ठेवला होता. त्याची वेल बनली. त्या वेलीपासून केवळ ३ मासांनी, म्हणजे जुलै २०२२ मध्ये छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे रताळ्याचे कंद मिळाले. यांचे एकत्रित वजन २ किलो २५० ग्रॅम होते. रताळ्याची वेल कापून अजूनही लागवड करता आली. यासाठी मला काहीही विशेष कष्ट घ्यावे लागले नाहीत. ‘आपण एवढीशी कृती केली, तरी ईश्वर कसे भरभरून देतो’, याचीच ही अनुभूती. प्रत्येकानेच स्वतःच्या घरी नैसर्गिक पद्धतीने लागवड केल्यास घरच्या घरीच विषमुक्त अन्नाची निर्मिती करता येईल.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.७.२०२२)

Leave a Comment