परग्रहावरील जीव पृथ्वीवर आक्रमण करणार ! – बाबा वेंगा यांची वर्ष २०२२ साठी भविष्यवाणी

नवी देहली – बल्गेरियात रहाणार्‍या अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उपाख्य बाबा वेंगा या प्रसिद्ध भविष्यवेत्त्या होऊन गेल्या. दृष्टी नसतांनाही त्यांना भविष्य स्पष्टपणे सांगता येत होते. त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत.

वर्ष २०२२ चीही भाकिते त्यांनी सांगितली आहेत. त्यानुसार वर्ष २०२२ मध्ये जगातील पाण्याचे संकट अधिक गडद होणार आहे. अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. नद्यांचे पाणी प्रदूषित होईल. पाण्याअभावी लोकांना इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे. तसेच ‘परग्रहावरील जीव पृथ्वीवर आक्रमण करणार आहेत’, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

बाबा वेंगा यांची वर्ष २०२२ ची भाकिते

‘एलियन्स’ची (परग्रहांवरील जिवांची) पृथ्वीवर आक्रमणाची शक्यता

‘एलियन्स’ हे ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह पृथ्वीवर जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवतील. त्यानंतर हे एलियन पृथ्वीवरील लोकांवर आक्रमण करू शकतात.

प्राणघातक विषाणूचा संसर्ग होणार !

जागतिक तापमानवाढीमुळे रशियाच्या सायबेरिया भागात बर्फ वितळण्यास प्रारंभ होईल. त्यामुळे शास्त्रज्ञांचे पथक प्राणघातक विषाणूचा शोध घेईल. हा विषाणू पुष्कळसंसर्गजन्य असेल आणि वेगाने पसरेल. या संसर्गाचा सामना करण्यासाठी जगातील सर्व व्यवस्था अपयशी ठरतील.

भ्रमणभाष आदींमुळे लोक मानसिकरित्या आजारी पडतील !

या वर्षी लोक भ्रमणभाष, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आणि संगणक यांवर अधिक वेळ घालवतील. त्यांची ही सवय हळूहळू व्यसनाचे रूप घेईल. त्यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडेल आणि ते मानसिकरित्या आजारी पडतील.

भूकंप आणि सुनामी यांचा धोका

जगात भूकंप आणि सुनामी यांचा धोका वाढेल. हिंद महासागरातील भूकंपानंतर एक मोठी सुनामी उद्भवेल. ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, भारत यांच्यासह जगातील अनेक देशांच्या किनारी भागांवर परिणाम करील. या सुनामीत शेकडो लोकांना जीव गमवावा लागणार आहे.

भारतात तापमान ५० अंश असेल !

जागतिक तापमानवाढीचा परिणाम भारतावरही होणार आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत कमाल तापमान ५० अंश सेल्सिअसच्या आसपास पोचेल. त्यामुळे देशात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. तापमानवाढीमुळे टोळांचे प्रमाण वाढेल. हे टोळ शेतातील पिकांवर आक्रमण करतील. यामुळे मोठी हानी होऊ शकते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment