मकरसंक्रांत : प्रश्न आणि त्यांची उत्तरे

 

संक्रांत ज्या दिशेने येते, त्या भागात सुख का येते ? संक्रांतीने धारण केलेल्या वस्तू महाग का होतात ?, असे अनेक प्रश्न संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला पडतात. अशा प्रश्नांची उत्तरे पुढील लेखातून समजून घेऊया.

 

१. करिदिन वाईट का मानला जातो ?

‘करिदिनादिवशी ब्रह्मांडात तमोगुणी लहरींचे आधिक्य वाढण्यास आरंभ होतो. हे आधिक्य तत्त्वस्वरूपी वाढत असतांना या भारित वायूमंडलात केल्या जाणार्‍या कृती रज-तमात्मक लहरींच्या निर्मितीला पुष्टी देणार्‍या असतात. संक्रातीच्या दिवशी रज-सत्त्वातील सत्त्वलहरींचे प्रमाण करिदिनादिवशी न्यून होण्यास आरंभ झाल्याने तमोगुणाचे प्राबल्य सूक्ष्म रूपात वाढण्यास प्रारंभ होऊ लागतो. हा काळ वाईट शक्तींच्या निर्मितीजन्य हालचालीसही पोषक असल्याने तो वाईट समजला जातो.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८, ११.१५)

 

२. संक्रांतीने धारण केलेल्या वस्तू त्या वर्षी महाग का होतात ?

‘वस्तू महाग होणे, याला कोणतेही आध्यात्मिक कारण नाही. हे निवळ व्यावहारिकतेच्या स्तरावर आचरलेले एक रुढीदर्शक माध्यम आहे.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८)

 

३. संक्रांत ज्या दिशेने येते, त्या भूभागात सुख येते आणि ती
ज्या दिशेकडे बघते, तेथे संकटे येतात, असे मानले जाते. यामागील शास्त्र काय ?

अ. दिशेने येणे

‘भूभाग हा स्थळाचे, तर बघणे हे काळाचे दर्शक आहे. संक्रांतीचा काळ हा रज-सत्त्व लहरींना पुष्टी देणारा असल्याने या काळात ब्रह्मांडमंडलात रजोगुण हा स्थळदर्शक, तर सत्त्वगुण हा काळाचे माध्यम म्हणून कार्य करतो. स्थळचक्राप्रमाणे ज्या दिशेतील लहरी संक्रातीतील सूर्याच्या गतीच्या रूपांतरणात्मक काळात निर्माण होणार्‍या तेजाच्या साहाय्याने भारित होतात, त्या दिशेकडे सुख येते, म्हणजेच या दिशेला स्पर्श करून तेजोलहरी भूमंडलात अवतरत असल्याने त्या वायूमंडलातील वाईट शक्तींचे निर्दालन करतच येतात; म्हणून या दिशेकडून येणार्‍या लहरींच्या प्रवाहाच्या संपर्कात येणार्‍या भूभागात केली जाणारी कृती वाईट शक्तींच्या त्रासापासून मुक्त रहाते; म्हणून त्या त्या भागात सुख येते, असे म्हटले जाते.

आ. दिशेकडे बघणे

ती ज्या दिशेकडे बघते, म्हणजेच या तेजाच्या प्राबल्यावर होणार्‍या युद्धाचा सूक्ष्म परिणाम आजूबाजूच्या संपर्कित दिशांना भोगावा लागल्याने तेथे संकटे येतात, असे म्हटले जाते. तेजाच्या घर्षणातून निर्माण होणार्‍या वाईट शक्तींचा निर्दलनात्मक विघटनरूपी सूक्ष्म परिणाम आजूबाजूच्या दिशांना भोगावा लागल्याने त्याला काळाच्या स्तरावर केवळ ‘बघणे’, म्हणजेच ‘स्थूल स्तरावर स्थळाच्या माध्यमाच्याही पलीकडे नेणे’, असे संबोधले जाते. हा परिणाम संकटजन्य, म्हणजेच वाईट शक्तींच्या रागाला सामोरा जाणारा समजला जातो.’

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८, रात्री ११.१५)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

 

मकरसंक्रातीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नयेत !

मकरसंक्रांतीच्या दिवशी लहान बालके आणि सुवासिनी काळी वस्त्रे परिधान करतात; परंतु हिंदु धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो, तसेच अध्यात्मशास्त्रानुसार काळा रंग वातावरणातील तमोगुणी स्पंदने आकृष्ट करतो. त्यामुळे या रंगाची वस्त्रे परिधान केल्यास तमोगुणी स्पंदने आकृष्ट झाल्याने व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. ‘मकरसक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करावीत अथवा परिधान केली, तरी चालतील’, या सूत्राला कोणत्याही धर्मग्रंथाचा आधार नसल्यामुळे या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नयेत.

‘मकरसंक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करावीत’, अशा प्रकारचा संदर्भ एखाद्या धर्मग्रंथात आढळल्यास तो कृपया [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावा.

(टपालासाठी पत्ता : श्री. भानु पुराणिक, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१)

Leave a Comment