संक्रांतीपूर्वी जगाचा थरकाप उडवणारे अघटित घडणार ! : स्वामी डॉ. शिवानंद शिवयोगी यांचे भाकीत

स्वामी डॉ. शिवानंद शिवयोगी

कोलार (कर्नाटक) – संक्रांतीपूर्वी पुष्कळ मोठे वाईट घडणार आहे. जगाचा थरकाप उडवणारे अघटित घडणार आहे. ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यापासून रोगराई वाढणार आहे. जानेवारी २०२२ पर्यंत रोगराई अशीच असणार आहे. लोक रोगाने नव्हे, तर भीतीने अधिक दगावतील. नोव्हेंबरपासून संक्रांतीपर्यंतच्या कालावधीमध्ये देश पातळीवर मोठे राजकीय अघटित घडू शकेल. त्यामुळे जगाचा थरकाप उडेल, असे भाकीत कोलार (कर्नाटक) येथील अरसिकेरे हारनहळ्ळी कोडी मठाचे स्वामी डॉ. शिवानंद शिवयोगी यांनी केले आहे.

स्वामी डॉ. शिवानंद शिवयोगी पुढे म्हणाले की, पुढच्या कार्तिक मासापर्यंत जलगंडांतर आहे. कोरोना आणखी वाढणार आहे. तरीही देवाच्या कृपेने चांगले दिवस येणार आहेत. राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांविषयी सध्या काही सांगणार नाही. कार्तिक मास संपल्यावर सांगीन.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment