खोटे लिखाण प्रसिद्ध करणार्या प्रा. श्याम मानव यांच्यावर विश्‍वास कसा ठेवायचा ?

अंनिसचे प्रा. श्याम मानव यांचे अज्ञान कि बौद्धिक दिवाळखोरी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर गेली अनेक वर्षे एकाच प्रकारचे आरोप करणारे अंनिसचे प्रा. श्याम मानव सध्या अनेक वृत्तवाहिन्यांवर जाऊन सनातनवर बेछूट आरोप करत आहेत. त्याविषयीचे खंडण येथे देत आहोत !
 
श्याम मानव हे स्वतः संमोहनशास्त्र शिकवायचे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते त्यांनी संमोहनावस्थेत ब्रेनवॉशिंग केलेले आहेत, असे म्हणायचे का ? 
जयंत आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ. कुंदा आठवले हे संमोहनशास्त्रात पारंगत आहेत. त्यामुळे ते समूह आणि व्यक्ती यांना संमोहित करू शकतात. कोणत्याही कार्यात ही पद्धत भयानक असून समोरच्या व्यक्तीला भ्रमिष्टावस्थेत नेण्यासाठी ही पद्धत अत्यंत परिणामकारक आहे. या पद्धतीमुळे मानवी बाँबही सिद्ध होतील. सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समिती या संस्थांमध्ये कार्यकर्त्यांचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉशिंग करण्यात येते. हे कार्यकर्ते केवळ आदेशाचे पालन करतात. त्यांना स्वतःचा असा मेंदू आणि विचारशक्ती नसते. त्यामुळे पुरोगामी विचारवंत आणि समाजसुधारक यांना पुढील लढाई माणसांशी नव्हे, तर अशा यंत्रमानवांशी करायची आहे.- प्रा. श्याम मानव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (दैनिक सनातन प्रभात (२७.८.२०१३))
 
श्याम मानव संमोहनतज्ञ असल्याने त्यांनी संमोहनाचा वापर करून धर्मद्रोही विचारांचा प्रचार केला, असे कुणाला वाटले, तर त्यात काय चुकीचे ?
इच्छेविरुद्ध संमोहन करता येत नाही. संमोहित व्यक्ती नैतिक मूल्यांच्या विरोधात वागत नाही. संमोहित व्यक्ती स्वत:चा जीव धोक्यात घालत नाही…; पण एखादी संघटना काहींना संमोहित करून देशविघातक कृत्य करू शकते.. – प्रा. श्याम मानव, संस्थापक आणि संयोजक, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (दैनिक सनातन प्रभात, (४.७.२०१४))
 
प्रा. श्याम मानव म्हणजे हिंदुविरोधी भोंदू सुधारक !
स्वतःला पुरोगामी, निधर्मी आणि तत्त्ववादी म्हणवणारे प्रा. श्याम मानव स्वतःच मोठे भोंदू बाबा आहेत. केवळ हिंदु धर्माशी खुन्नस ठेवायची आणि स्वतःच्या जिवावर बेतली की, शेपूट घालायचे हीच या हिंदुविरोधी वळवळ्यांची मानसिकता असल्याचे सत्य मला उमगले. तुम्ही सुद्धा अशा भोंदू सुधारकांना ओळखा. त्यांचा पुरोगामित्वाचा बुरखा फाडण्याची संधी मिळाल्यास मुळीच दवडू नका. – श्री. रेणुकादास मुळ्ये, संपादक, दैनिक लोकयोद्धा (दैनिक सनातन प्रभात (६.१०.२०१३))
 
प्रा. श्याम मानव यांंनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींविषयी अनुद्गार काढून त्यांचा घोर अपमान करणे !
कुलकर्ण्यांच्या १२ वर्षांच्या पोराने रेड्याला बोलायला लावले, हे थोतांड आहे आणि भिंत चालवली हा चमत्कार नाही, अशा अश्‍लाघ्य शब्दांत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख प्रा. श्याम मानव यांंनी वारकरी संप्रदायाचा प्राण असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींविषयी अनुद्गार काढून त्यांचा घोर अपमान केला. या वेळी काँग्रेसचे ऊर्जामंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी वारकर्‍यांची माफी मागितली. (चूक प्रा. मानव यांनी केली असतांना श्री. वळसे-पाटील यांनी त्याविषयी माफी का मागावी ? – संपादक) (दैनिक सनातन प्रभात, १७ जानेवारी २००६)
 
१. संमोहनशास्त्र इतके प्रभावशाली असते, तर जगभरातील संमोहनशास्त्र जाणणार्‍यांपैकी एकाचाही समाजावर परिणाम का झाला नाही ? 
 
२. तसे असते, तर जगात संमोहन उपचारतज्ञ म्हणून नाव असणारे प.पू. डॉ. आठवले यांनी साधनेची वाटचाल का चालू केली असती ?
 
३. राजकारण्यांच्या सभेला पैसे देऊन माणसे गोळा करावी लागतात. संतांना तसे का करावे लागत नाही ? श्याम मानवांच्या सभांना किती उपस्थिती असते ? याचा त्यांनी विचार करावा आणि साधनेकडे वळावे !
 
 

खोटे लिखाण प्रसिद्ध केल्याविषयी शिक्षा झालेले प्रा. श्याम मानव यांच्या कोणत्याही विधानावर विश्‍वास तरी कसा ठेवायचा ?

पुणे येथील ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांच्याविषयी खोटे लिखाण प्रसिद्ध केल्यासंबंधी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पाध्ये यांच्या न्यायालयाने २.४.१९९१ मध्ये प्रा. श्याम मानव यांना एक दिवसाची कैद आणि १०० रुपये दंड ठोठावला. न्या. पाध्ये यांनी निकालात म्हटले होते, मानव यांचा गुन्हा गंभीर असून त्यांना कायद्यानुसार मोठी शिक्षा आणि दंड करायला हवा; मात्र त्यांचे सामाजिक (?) कार्य लक्षात घेऊन त्यांना सौम्य शिक्षा करण्यात येत आहे.
 
या संदर्भातील स्पष्ट कबुली प्रा. मानव यांनी दूरचित्रवाणीवरील वाहिनीवर दिली होती. ते म्हणाले, मी दिवसभर न्यायाधिशांसमोर बसून होतो. त्यानंतर मला सोडण्यात आले.