केळीची पाने : पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त

Article also available in :

भाग्यनगरमधील (हैद्राबाद) एका शास्त्रज्ञाने शोधले की, केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील, पानातील जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्ल्यानंतर कर्करोग (कॅन्सर) वाढवणारी ग्रंथी हळूहळू निष्क्रीय होत जाते. त्यामुळे जुन्या काळातील लोक केळीच्या पानावर जेवण घ्यायचे; कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर ठेवले की, तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा; पण आज उलट झाले आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल यांच्यामुळे महाभयानक परिस्थिती ओढवत आहे. नद्या-नाले तुंबल्यामुळे पूर येत आहे. शहरी आणि खेडोपाडी भागात लग्न समारंभात प्लास्टिक कोटींग असलेल्या पत्रावळी, द्रोण यांचा सर्रास वापर होतो. त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्नाद्वारे जाऊन कर्करोग वाढवत आहेत. आता वेळ आली आहे, ‘जुनं ते सोनं आहे’, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिद्ध झाले आहे. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे, तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपीन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.

१. केळीच्या पानांवर जेवण ग्रहण केल्याने होणारे लाभ

केळीच्या पानावर जेवण्याचे शरिराला होणारे लाभ आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत.

अ. केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्त्व अन्नात मिसळतात, जे शरिरासाठी चांगले असतात.

आ. केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं येणे अशा समस्या दूर होतात.

इ. केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात ‘एपिगालोकेटचीन गलेट’ आणि ‘इजीसीजी’ सारखे ‘पॉलीफिनोल्स अँटीऑक्सिडेंट’ आढळतात. हे अँटीऑक्सिडेंट आपल्या शरिराला मिळतात आणि ते त्वचेला दीर्घकाळापर्यंत तरुण ठेवण्यास साहाय्य करतात.

ई. त्वचेवर पुरळ, डाग, मुरुम असतील, तर केळीच्या पानावर खोबरेल तेल लावून ते पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.

२. भारतीय परंपरांचे मूलतत्त्व आणि त्यामागील विज्ञानवादी दृष्टीकोन

सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून त्याच्या रक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत ऊन, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती निसर्गाचे ‘दोहन’ करायला शिकवते, ‘शोषण’ नव्हे. उदाहरणार्थ आपण गायीचे दूध काढून घेतो; पण तिला मारत नाही. गायीला मारणे, हे झाले ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमूत्र अन् शेण आपल्या उपयोगासाठी घेणे म्हणजे ‘दोहन’ ! अशा प्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेतांना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणे, हे भारतीय परंपरांचे मूलतत्त्व आहे.

गंमत अशी की, या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून वा धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचे शास्त्र उमगलेले नव्हते. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे या परंपरांची उपयुक्तता शास्त्रीय कसोट्यांवर पडताळून पहाणे आणि वैज्ञानिक परिभाषेत त्यांचे महत्त्व पटवून देणे शक्य झाले आहे. याचसमवेत उपयुक्त आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणेही शक्य झाले आहे. ‘केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे, म्हणून ती करावी’, हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.

३. केळीचे पान वापरण्याची भारतीय परंपरा !

केळीच्या पानावर जेवणे, ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचे पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण देशात विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षे असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवतांना भांड्याच्या तळाशी केळीचे पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. तसेच तळाशी केळीचे पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे, तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपीन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.

४. केळीच्या पानावर जेवल्याने होणारे लाभ

केळीच्या पानावर जेवण्याचे शरिराला होणारे लाभ आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात ‘पॉलीफेनॉल’ नावाचा घटक असतो, जो नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो. जेवण ग्रहण करून झाले की, पान गुरांना घातले जाते. ते गुरांचेही अतिशय आवडीचे अन्न आहे. याचाच अर्थ निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती त्यालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचते आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचे उत्सर्जनही अल्प होते.

५. प्लास्टीक डिशपेक्षा केळीची पाने वापरणे पर्यावरणपूरक !

सध्या कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश (ताटल्या) जेवणासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो ? केळीचे पान हा याला एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पाने घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात; पण ती उपलब्ध असतात. शहराच्या आजूबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पाने विकणे, हे एक चांगले उदरनिर्वाहचे साधन होऊ शकते. मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्थानकांच्या बाहेर १० रुपयांना ४ वगैरे अशा मूल्यामध्ये केळीची पाने मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पाने वापरण्यात अशक्य काहीच नाही.

– संजीवन फंगल इन्फेक्शन, मूळव्याध, दमा, आम्लपित्त, मायग्रेन वनौषधी उपचार केंद्र, नगर. (संदर्भ : व्हॉट्सअ‍ॅप)

Leave a Comment