अनेक हिंदु धर्माभिमानी, हिंदुत्ववादी, अधिवक्ते, वाचक यांचा सनातनला पाठिंबा !

सनातनच्या बाजूने खटला लढवण्यास आम्ही सिद्ध ! – अधिवक्ता सुजित लाळे

  • पुरोगामी आणि हिंदुद्वेष्टे यांना हिंदुधर्मप्रेमी अधिवक्त्यांची सणसणीत चपराक !
  • सनातनच्या साधकाची बाजू मांडण्यासाठी आटपाडी (जिल्हा सांगली) येथील सहा अधिवक्त्यांचा पाठिंबा

आटपाडी (जिल्हा सांगली), १८ सप्टेंबर (वार्ता.) – सनातन संस्था ही अध्यात्मप्रसार करणारी संस्था आहे. त्या संस्थेचे साधक अशा प्रकारचे कृत्य करणे शक्य नाही. हिंदूंची बाजू प्रभावीपणे मांडण्याचे काम सनातन संस्था करत आहे. यामुळेच सनातन संस्थेच्या साधकाला षड्यंत्र करून गोवण्यात आले आहे. आम्ही तुमची वाट पहात होतो. तुम्ही संपर्क केला नसता, तर आज आम्ही तुम्हाला संपर्क करणार होतो. अटक केलेल्या सनातनच्या साधकाचे केवळ  वकीलपत्र घेत नसून त्याचा संपूर्ण खटला लढवण्यास आम्ही सिद्ध आहोत. हे सर्व सिंचन घोटाळ्यातील बाबी, तसेच जुनी प्रकरणे दडपण्यासाठी नवीन प्रकरण काढण्यात आलेले आहे, अशी प्रतिक्रिया आटपाडी येथील अधिवक्ता सुजित लाळे यांनी सनातनच्या साधकांकडे व्यक्त केली. (सनातनची न्याय्य बाजू लक्षात घेऊन सनातनच्या साधकाचे वकीलपत्र घेण्याची सिद्धता दर्शवून प्रत्यक्ष खटला लढवण्याची सिद्धता दर्शवणार्या  सर्व अधिवक्त्यांचे सनातन संस्थेने आभार व्यक्त केले आहेत ! असे हिंदु धर्माभिमानी अधिवक्ते सर्वत्र हवेत ! – संपादक)

सांगली जिल्ह्यात अनेक हिंदु धर्माभिमानी, हिंदुत्ववादी, वाचक यांचा सनातनला पाठिंबा !
भाजप उपाध्यक्ष अभिजित शिंदे सनातनच्या पाठीशी !

मिरज, १८ सप्टेंबर (वार्ता.) – गेल्या दोन दिवसांत सांगली जिल्ह्यातून विविध हिंदु धर्माभिमानी, हिंदुत्ववादी, ‘दैनिक सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक यांनी सनातनच्या साधकांना प्रत्यक्ष भेटून, दूरभाषद्वारे सनातनच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत ‘आम्ही पूर्णत: सनातनच्या पाठीशी आहोत’, असे सांगितले. भाजपचे सांगलीचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. अभिजित शिंदे यांनी सनातन संस्थेच्या ब्राह्मणपुरी येथील आश्रमात येऊन साधकांची भेट घेतली. ‘सनातनची बाजू सत्याची बाजू आहे. माझे साहाय्य लागेल, तेव्हा मला हाक मारा. मी तत्परतेने तुमच्या साहाय्यास येईन’, असे सांगून त्यांनी स्वतःचा भ्रमणभाष क्रमांक दिला. (सनातनवर होणार्याा वृथा आरोपांच्या विरोधात सनातनच्या बाजूने उभे रहाणारे श्री. अभिजित शिंदे यांच्यासह सर्व हिंदुत्ववादी आणि हिंदु धर्माभिमानी यांचे आभार ! – संपादक)

एका अधिवक्त्यांचे आश्रमात येऊन साहाय्याचे आश्वासन ! 
१७ सप्टेंबर या दिवशी सनातनच्या एका हितचिंतक अधिवक्त्यांनी सनातन संस्थेच्या मिरज येथील आश्रमात येऊन साधकांनी भेट घेतली. साधकांची आस्थेने चौकशी करून तुम्हाला काही त्रास नाही ना ?, अशी विचारणा केली. कोणतेही साहाय्य लागल्यास मला हाक मारा, असे त्यांनी सांगितले.