दांभिक पुरोगाम्यांच्या दबावामुळेच सनातन संस्था लक्ष्य !

हिंदुत्ववादी संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद 
 
कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकांचा छळ !
  • दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे तपास करण्याची मागणी ! 
  • संघटना निरपराध समीर गायकवाड यांच्या पाठीशी ! 
  • दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात माहिती देण्यासाठी शासनाशी केलेला पत्रव्यवहार पत्रकारांसमोर उघड !
डावीकडून अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, बोलतांना श्री. अभय वर्तक आणि वैद्य उदय धुरी
मुंबई – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी १६ सप्टेंबर या दिवशी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली. त्याला अधिवक्ताही मिळू दिला नाही. त्याच वेळी ‘जितं मया’च्या आवेशात डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांचे कुटुंबीय, अखिल भारतीय अंनिसचे प्रा. श्याम मानव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, काँग्रेसचे सचिन सावंत इत्यादी दांभिक पुरोगाम्यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. अजून श्री. गायकवाड यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही आणि न्यायालयाने कुणालाही दोषी ठरवलेले नाही, असे असतांनाही सनातनवर बंदी घालण्याच्या अवकाळी मागण्या चालू झाल्या आहेत. सतत सनातन संस्था आणि संस्थेशी संबंधित व्यक्तींकडे संशयाचे बोट दाखवून विवेकी गोंगाट निर्माण करायचा आणि खर्यास गुन्हेगारांना पकडण्यापासून पोलिसांना परावृत्त करायचे, असे हे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक यांनी १८ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केले. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव आणि सनातन संस्थेचे कायदेविषयक समादेशक (सल्लागार) अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी उपस्थित होते.

तथाकथित पुरोगाम्यांच्या षड्यंत्राला बळी न पडता, निष्पक्षपणे अन्वेषण होण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ! 
अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर म्हणाले की, तथाकथित पुरोगाम्यांच्या षड्यंत्राला बळी न पडता निष्पक्षपणे अन्वेषण व्हावे, याकरता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
१. ‘डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात पुरोगाम्यांची विचारसरणी एकांगी आहे. त्यांच्या दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे अन्वेषण करावे. या हत्यांचे सर्व पैलू पडताळण्यात कोणत्याही प्रकारची कसलीही कसर राहू नये’, असे आदेश द्यावेत.
 
२. अन्वेषणाच्या दृष्टीने दाभोलकर-पानसरे कुटुंबियांच्या सूचनांवर कार्यवाही व्हावी; मात्र अन्वेषण दलाचे अनधिकृत नेतृत्व त्यांच्यावर सोपवण्याची चूक टाळावी. 
 
३. सनातन संस्थेला लक्ष्य करून आरोप करणार्या काही व्यक्ती आणि संघटना यांची  वृत्ती अत्यंत संशयास्पद वाटते. सनातन संस्थेने त्यांचे आर्थिक घोटाळे उघड केले असल्यामुळे काही निष्कर्षांपर्यंत अन्वेषण यंत्रणा पोहोचू नयेत, या धडपडीतून सनातनला लक्ष्य केले जात आहे का ? याचीही सखोल चौकशी व्हावी.
 
४. श्याम मानव यांची अन्वेषण कार्यातील लुडबूड थांबवावी. ते ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उल्लेख करून टेंभा मिरवत आहेत, त्यास आळा घालावा.
 
श्री. वर्तक म्हणाले की, 
१. हीच पुरोगामी मंडळी दंगलखोर रझा अकादमी आणि आतंकवादी याकुब मेमनच्या अंत्ययात्रेला सहस्रोंच्या संख्येने धर्मांधांना गोळा करणार्यांीविषयी शांत बसली होती. 
 
२. या पुरोगाम्यांकडून डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांच्या प्रकरणी आम्ही दिलेल्या महत्त्वाच्या माहितीविषयी अन्वेषण झाले नाही, असे खोटे चित्र निर्माण करण्यात आले. त्यांच्याकडून राज्यशासनाची अपकीर्ती चालू आहे. 
 
३. सातत्याने खोटे आरोप करणे, सेलीब्रेटींसह आंदोलने करणे आणि न्यायालयात याचिका करणे, या माध्यमांतून राज्यशासन अन् पोलीस यांना त्यांनी वेठीस धरले आहे. त्यामुळे दबावापोटी अन्वेषण यंत्रणा या तथाकथित पुरोगाम्यांच्या बाहुल्या बनल्या आहेत.
 
४. सनातन संस्था ही आध्यात्मिक आणि राष्ट्रभक्त संस्था आहे. 
 
५. कोणताही निष्कर्ष समोर आलेला नसतांना पुरोगाम्यांच्या बेछूट आरोपांमुळे संस्थेची नाहक अपकीर्ती होत आहे. 
 
६. संस्थेने अनेक देवळांतील घोटाळे बाहेर काढणे, पर्यावरण रक्षण चळवळ राबवणे, राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे आदी जनजागृती करणार्या  कृती शिस्तबद्धरीत्या राबवल्या आहेत. 
 
७. त्यामुळे निर्माण झालेले राष्ट्रीय स्तरावरील कार्य रोखण्याचे षड्यंत्रच या तथाकथित पुरोगाम्यांनी आखलेले दिसते. 
 
८. सनातन संस्था या आरोपांच्या वादळातून निश्चिलत तरून निघेल आणि समाजात राष्ट्रभक्ती रुजवण्याच्या कामी अधिक जोमाने कार्यरत होईल, याचा आम्हाला विश्वास आहे.
या पत्रकार परिषदेला वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांचे ७५ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. 
 
सनातन संस्थेच्या पाठीशी राहून हिंदुत्ववाद्यांच्या मानहानीला विरोध करणार ! – हिंदुत्ववादी संघटना 
हिंदू गोवंश रक्षा समिती, राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ, हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद, हिंदू राष्ट्र सेना, श्री महाराष्ट्र रामलीला मंडळ, महाराणा प्रताप बटालियन, शिवसेना गणेशोत्सव समिती या हिंदुत्ववादी संघटनांनीही सनातन संस्थेला उघड पाठिंबा दिला आहे. त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांवरील मानहानीच्या विरोधात संघटितपणे उभे रहाण्याचा मानस व्यक्त केला, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उदय धुरी यांनी या वेळी दिली.
 
चोरासारखे पत्रकार परिषदेत येऊन साम्यवादी आनंद पटवर्धन यांचा अविवेकी धिंगाणा !
मुंबई – कोणत्याही प्रकारचे निमंत्रण नसतांना एक पत्रकार म्हणून साम्यवादी आनंद पटवर्धन हे सनातन संस्थेच्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. त्यांनी अरेरावी करत कॅमेर्याद्वारे पत्रकार परिषदेचे चित्रीकरण केले. याच आनंद पटवर्धन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका करून जेम्स लेन यांच्या पुस्तकावरील बंदी उठवली. अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांनी माहिती दिली की, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर अवैधरित्या प्रतिबंधित क्षेत्रात आंदोलन करणारे आमदार कपिल पाटील, आनंद पटवर्धन यांच्यावर पोलिसांनी काही कारवाई केली नाही. तेव्हा पटवर्धन यांच्यातील साम्यवादी जागा झाला. अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर म्हणाले की, जर सामान्य लोक या ठिकाणी असते, तर पोलिसांनी त्यांना बेदम चोप दिला असता. यावर आक्षेप घेत पटवर्धन म्हणाले, तुम्ही लोकांना मारहाण करावी, यासाठी आवाहन करत आहात का ? त्यावर अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांनी सांगितले की, सामान्यांशी पोलीस कसे वागतात आणि पुरोगाम्यांशी कसे वागतात, तेच आम्हाला सांगायचे आहे. या वेळी पत्रकारांनीही पटवर्धन यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला. त्यांना बाहेर काढा, असे पत्रकारांनी सांगितले. पत्रकार परिषदेच्या आयोजकांनी पटवर्धन यांच्याकडे ओळखपत्र मागितले; मात्र ते उद्दामपणे म्हणाले, मी पत्रकार आहे. मी माहिती देणार नाही आणि ओळखपत्रही दाखवणार नाही. ते शेवटपर्यंत बसून राहिले. (अशा प्रकारे लपून-छपून पत्रकार परिषदेत येऊन ती अनधिकृतपणे चित्रीकरण करणारे आनंद पटवर्धन यांचा हाच का विवेकवाद ? चोरासारखी कृती करणार्या साम्यवाद्यांनी स्वतःच्या पत्रकार परिषदेत असा प्रकार खपवून घेतला असता का ? – संपादक)