‘मेरिंगे’ (Merengue) या स्पॅनिश नृत्यप्रकाराचा होणारा परिणाम

एस्.एस्.आर्.एफ्.च्या दोन साधकांनी ‘मेरिंगेे’ हा स्पॅनिश नृत्यप्रकार सादर केला. या नृत्यप्रकाराचा वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे या साधकांवर काय परिणाम होतो, हे अभ्यासण्यात आले.

 

१. ‘मेरिंगेे’ या नृत्यासाठी परिधान केलेला पोषाख
आणि पायातील बूट यांचा सूक्ष्म स्तरावर होणारा परिणाम

नृत्य करणार्‍यांचा पोषाख विदेशी होता आणि त्यांनी पायात बूटही घातले होते. बूट घातल्यामुळे चौथ्या पाताळातून प्रक्षेपित होणारी त्रासदायक शक्ती नृत्य करणार्‍यांना त्रास देत असल्याचे जाणवले. विदेशी कपड्यांतील रज-तम स्पंदने पोषाख धारण करणार्‍यांच्या देहातील सप्तचक्रे आणि नवद्वार यांच्यावर रज-तम यांचे आवरण निर्माण करत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे त्रासदायक शक्ती सप्तचक्रे आणि नवद्वारे यांकडे वेगाने आकृष्ट होऊन स्थूलदेहासह सूक्ष्मदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह, तसेच सर्व कोश यांवर त्रासदायक आवरण निर्माण करत होते. व्यक्तीच्या लिंगदेहावर याचा त्रासदायक परिणाम झाला असल्याचे यावेळी जाणवले.

 

२. मेरिंगेे या नृत्यासाठी लावलेल्या पार्श्‍वसंगीताचा सूक्ष्म स्तरावर होणारा परिणाम

अ. या नृत्याच्या वेळी स्पॅनिश भाषेतील गाणे लावण्यात आले होते. या गाण्यातून संपूर्ण वातावरणात पुष्कळ प्रमाणात रज-तम प्रधान त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होऊन संपूर्ण वातावरण दूषित झाले होते.

आ. या गाण्याच्या धुनीवर केलेल्या ‘मेरिंगेे’ या स्पॅनिश नृत्यप्रकारामुळे व्यक्तीचे मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर या चक्रांकडे पाताळातील त्रासदायक शक्ती आकृष्ट झाली.

‘मेरिंगे’ नृत्य करतांना जोडपे (संदर्भ : एक विदेशी संकेतस्थळ)

इ. गाण्यातील रजोगुणी शब्द आणि संगीत यांमुळे त्या गाण्याच्या तालावर नृत्य करण्याची प्रेरणा मिळून त्याला अनुरूप असणारे रज-तम प्रधान मेरिंगेे नृत्यप्रकार ऐकणार्‍यांकडून होत असल्याचे जाणवले. तसेच गाण्यातील संगीत आणि शब्द यांच्या त्रासदायक नादाचा परिणाम ऐकणार्‍या अन् नाचणार्‍या व्यक्तींच्या मनावर होऊन त्यांच्या मनामध्ये वासनामय प्रेमाची भावना जागृत होत होती.

ई. संगीतातून प्रक्षेपित होणार्‍या मायावी स्पंदनांमुळे नृत्य पहाणार्‍या आणि करणार्‍या व्यक्तींच्या मनाला चांगल्या संवेदना जाणवून त्यांचा नृत्य पहाण्यातील किंवा करण्यातील सहभाग वाढत होता.

उ. या गाण्याच्या संगीतातून आणि नृत्यप्रकारातून पुष्कळ प्रमाणात मायावी शक्तीचे प्रक्षेपण झाल्यामुळे हे नृत्य करतांना मायावी सुख जाणवून नृत्य करणार्‍या आणि पहाणार्‍या व्यक्तींचे मन मायेत अडकते.

 

३. ‘मेरिंगेे’ या स्पॅनिश नृत्यप्रकाराची जाणवलेली वैशिष्ट्ये !

कु. मधुरा भोसले

अ. या नृत्याच्या हालचाली तामसिक असून त्या कामवासना उद्दिपित करणार्‍या आहेत. त्यामुळे हे नृत्य करणार्‍या आणि पहाणार्‍या व्यक्तींच्या मनामध्ये कामवासनेचे विचार वाढतात.

आ. या नृत्यात कमरेखालील अंगाची लवचिकता महत्त्वाची असल्याने त्यामुळे आठवे आणि नववे द्वार यांकडे पाताळातून धुरासारखी त्रासदायक शक्ती आकृष्ट होते. त्यामुळे ‘मेरिंगेे’ नृत्य करणार्‍यांच्या देहावर त्रासदायक शक्तीचे सूक्ष्मातून आक्रमण होत असल्याचे जाणवले.

इ. या नृत्यात जोडीने नृत्य करत असल्यामुळे त्यामध्ये कामवासनायुक्त प्रेमाची भावना नृत्य करणार्‍यांच्या मनामध्ये जागृत होते. त्यामुळे हे नृत्य पहाणार्‍यांच्याही मनामध्ये वासनायुक्त प्रेमाची भावना जागृत होऊन मनामध्ये प्रेमाचे विचार प्रबळ होतात.

ई. या नृत्यप्रकाराकडे ४ थ्या पाताळातील त्रासदायक मायावी शक्ती आकृष्ट होते.

 

४. ‘मेरिंगेे’ या स्पॅनिश नृत्यप्रकाराचा वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवर झालेला परिणाम

अ. त्यामुळे त्यांनी टाळ्या वाजवून सुखाने दाद दिलीे.

आ. त्रास असणार्‍या साधकांवर या संगीत आणि नृत्य यांचा परिणाम ५० ते ७० टक्के इतका झाला.

इ. त्रास असणार्‍या साधकांच्या भोवती रज-तम प्रधान शक्तीचे त्रासदायक दाट आवरण निर्माण झाले आणि त्यांचे शरीर, मन आणि बुद्धी यांवर ४ थ्या पाताळातील वाईट शक्तींच्या शक्तीचे प्रक्षेपण झाले.

 

५. ‘मेरिंगेे’ या स्पॅनिश नृत्यप्रकाराचा वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या साधकांवर झालेला परिणाम

अ. या साधकांच्या भोवती चांगल्या शक्तीचे संरक्षककवच कार्यरत असल्यामुळे त्यांचा स्थूलदेह आणि मनोदेह यांवर मेरिंगेे नृत्यप्रकारातील संगीत अन् नृत्य यांचा १० ते ३० टक्के इतकाच परिणाम झाला.

आ. या नृत्यातील संगीत आणि नृत्य यांतून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांशी लढण्यासाठी त्रास नसणार्‍या साधकांतील सात्त्विकतेचा व्यय होत होता. त्यामुळे त्यांच्यातील एकूण सात्त्विक ऊर्जा आणि तिचे प्रभामंडल यांचे प्रमाण न्यून झाले.

इ. हे संगीत सलग काही मिनिटे ऐकल्याने आणि नृत्य सलग काही मिनिटे पाहिल्याने या साधकांच्या भोवती रज-तम प्रधान शक्तीचे त्रासदायक विरळ आवरण निर्माण झाले अन् त्यांचे ईश्‍वराशी असणारे अनुसंधान तुटले.

 

६. ‘मेरिंगेे’ या स्पॅनिश नृत्याशी संबंधित विविध घटक आणि त्यांच्या परिणामांचे स्वरूप

‘मेरिंगे’ या स्पॅनिश नृत्याशी संबंधित विविध घटक घटकांच्या परिणामांचे स्वरूप
१. पोषाख, पार्श्‍वसंगीत आणि नृत्य पूर्णपणे रज-तमयुक्त असणे
२. नृत्याकडे कोणत्या पाताळातील त्रासदायक शक्ती आकृष्ट होते ? पाताळ क्र. ४
३. नृत्य करणार्‍यांच्या कोणत्या चक्रांवर अधिक परिणाम होतो ? मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर
४. नृत्याचा परिणाम कोणत्या देहांवर होतो ? सर्व देहांवर (स्थूलदेह (शरीर), सूक्ष्मदेह, प्राणदेह, वासनादेह, मनोदेह (मन), कारणदेह (बुद्धी), आणि महाकारणदेह (अहं))
५. नृत्याचा परिणाम कोणत्या कोशांवर होतो ? सर्व कोशांवर (अन्नमयकोश, प्राणमयकोश, मनोमयकोश, विज्ञानमयकोश आणि आनंदमयकोश)
६. नृत्यामुळे कोणती भावना प्रबळ होते ? कामवासनायुक्त प्रेमभावना
७. नृत्यामुळे कोणती अनुभूती येते ? मायावी सुखाची, मायावी गंधाची आणि मायावी स्पर्शाची
८. नृत्यातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक शक्तीचे प्रमाण (टक्के) २० ते ४०
९. नृत्यातून प्रक्षेपित होणार्‍या मायावी शक्तीचे प्रमाण (टक्के) १० ते ३०
१०. नृत्यामुळे होणारे दुष्परिणाम मन मायेत अडकणे आणि मनोराज्यात रमणे अन् लिंगदेह त्रासदायक शक्तीने भारित होऊन जड होणे
११. नृत्याचा परिणाम किती काळ टिकतो ? १५ दिवस ते १ मास
१२. नृत्यामुळे किती काळाची साधना व्यय होते ?
१२ अ. नृत्य पहाणारे १ मास
१२ आ. नृत्य करणारे ३ मास

 

७. ‘मेरिंगेे’ या स्पॅनिश नृत्यप्रकाराच्या संदर्भातील निष्कर्ष

अ. हा नृत्यप्रकार रज-तम प्रधान आणि त्रासदायक असल्यामुळे हे नृत्य पहाणार्‍यांवर १० ते ३० टक्के अन् प्रत्यक्ष नृत्य करणार्‍यांवर ५० ते ७० टक्के इतका दुष्परिणाम होतो.

आ. या नृत्यातून त्रासदायक मायावी शक्ती प्रक्षेपित होऊन व्यक्तीचा देह आणि तिच्या सभोवतालचे वातावरण दूषित होते.

इ. व्यक्तीचे मन मायावी सुखात अडकून मनोराज्यात रमते. त्यामुळे व्यक्ती वास्तविक परिस्थितीपासून दूर जाते.

ई. या नृत्यामुळे व्यक्तीच्या भोवती त्रासदायक आवरण निर्माण होऊन तिच्यातील सकारात्मक उर्जा नष्ट होते आणि तिच्यात नकारात्मक ऊर्जा वाढते.

उ. या नृत्यामुळे ४ थ्या पाताळातील वाईट शक्तींना नृत्य करणार्‍यांवर सहजरित्या परिणाम करता येतो.

‘मेरिंगेे’ या नृत्यामुळे व्यक्तीची आध्यात्मिक स्तरावर हानी होते. त्यामुळे लोकांनी हे नृत्य पाहू नये किंवा हे नृत्य करू नये. भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य सात्त्विक असल्याने त्यामुळे रसिकांनी भारतीय शास्त्रीय संगीत अन् नृत्य यांचा आस्वाद घेतल्यास त्यांना आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ होऊ शकतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (४.३.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment