‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने संग्रह केलेल्या अमूल्य वस्तूंचे जतन करण्यासाठी आणि भव्य संग्रहालय (म्युझियम) उभारणीसाठी साहाय्य करा !

वस्तूसंग्रहालय तज्ञ आणि वास्तू विशारद यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुसंधी !

सहस्रो वर्षांपूर्वी ऋषींनी दिलेले ज्ञान (वेद, पुराणे), संतांची चरित्रे, तसेच तीर्थक्षेत्रे आजवरच्या अनेक पिढ्यांनी जपून ठेवली आहेत. त्यामुळेच आज सर्वांना या ज्ञानाचा सर्वंकष लाभ होत आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने हिंदु धर्म, तसेच संस्कृती यांच्याशी संबंधित, तसेच तीर्थक्षेत्री मिळणार्‍या दुर्मिळ वस्तू, संतांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे हस्ताक्षर, ठसे आणि छायाचित्रे आदींचा संग्रह केला जात आहे. त्याचसमवेत त्रासदायक शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमणे केलेल्या अनेक वस्तूही संग्रही आहेत. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हा अमूल्य ठेवा पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहे.

 

१. ‘संग्रहालय’ क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता !

वस्तूंचे जतन करण्यासाठी ‘क्युरेटर’ (वस्तू संग्रहालयातील वस्तूंची काळजी घेणारा (या संदर्भात विशिष्ट शिक्षण देण्यात येते.)), वस्तूसंग्रहालय तज्ञ (‘म्युझिओलॉजिस्ट’) आदींच्या पुढील साहाय्याची आवश्यकता आहे.

अ. जतन प्रक्रियेच्या संदर्भातील माहितीचा अभ्यास करणे, त्याविषयी साधकांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना ती प्रक्रिया शिकवणे

आ. ‘वस्तूंचा संग्रह करण्यासाठी वातावरण कसे असावे ? खोल्यांतील व्यवस्था कशी असावी ? कपाटे कशी असावीत ?’, यांविषयी मार्गदर्शन करणे

इ. यासाठी लागणारे साहित्य, रसायने आदी उपलब्ध करून देणे

ई. जतन प्रक्रियेच्या कार्यात सहभागी होणे

 

२. भव्य संग्रहालय (म्युझियम) उभारणीसाठी वास्तूतज्ञांचे मार्गदर्शन हवे !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने आतापर्यंत सहस्रो वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा संग्रह केला आहे. या संग्राह्य वस्तूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी भव्य संग्रहालय (म्युझियम) उभारण्याचा विश्‍वविद्यालयाचा मानस आहे. या भावी वास्तूच्या उभारणीकरता मार्गदर्शन करण्यासाठी वास्तूविशारद (आर्किटेक्ट) आणि वास्तूतज्ञ यांच्याही साहाय्याची आवश्यकता आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने भावी पिढीसाठी आरंभलेल्या या कार्यात सहभागी होणे, हा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यातील सहभागच आहे. या क्षेत्रातील जाणकार या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून आपली माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर कळवावी.

‘सेवा’ म्हणून किंवा सेवामूल्य घेऊन या कार्यात सहभागी होणार असल्यास तसेही कळवावे.

संपर्कासाठी इ-मेल पत्ता : [email protected]

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.

 

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

वरील धर्मकार्यात सहभागी होऊ शकतील, असे आपल्या परिचयातील ‘क्युरेटर’ (वस्तू संग्रहालयातील वस्तूंची काळजी घेणारा), वस्तूसंग्रहालय तज्ञ, वास्तूविशारद (आर्किटेक्ट) किंवा वास्तूतज्ञ असल्यास त्यांची माहिती वरील क्रमांकावर कळवावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment