स्वत:च्या मिळकतीपेक्षा (ज्ञात उत्पन्नापेक्षा) उच्च स्तराचे रहाणीमान असणार्‍यांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आणि सनातन प्रभातला कळवा !

शासकीय नोकरदारांपैकी अनेकजण इतक्या हुशारीने भ्रष्टाचार करतात की, त्यांना लाच घेतांना रंगेहात पकडणे अशक्य असते. नोकरीतून मिळणार्‍या उत्पन्नाच्या तुलनेत उच्च रहाणीमान असणारे कर्मचारी हे बहुधा या गटातील असतात. त्यामुळे आपल्या कुटुंबातील, नात्यातील आणि परिसरातील असे ज्ञात उत्पन्नापेक्षा उच्च स्तराचे रहाणीमान असणारे शासकीय कर्मचार्‍यांसह इतर कोणी आढळल्यास त्यांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला कळवा. तसे करणे हे आपले राष्ट्राच्या संदर्भातील कर्तव्य आहे आणि ती आपली समष्टी साधनाही आहे. त्यामुळे रज-तमप्रधान आजन्म कारावासात जातील आणि सात्त्विक हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास साहाय्य होईल. (पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.; फॅक्स क्रमांक : (०८३२) २३१८१०८; ई-मेल : [email protected])