सनातन संस्थेच्या मूर्तीशास्त्राप्रमाणे मूर्ती करण्यास प्रारंभ केल्यावर २५० मूर्तींची मागणी

श्री गणेशमूर्ती सिद्ध करतांना श्री. संभाजी कुंभार

बेळगाव – रायबाग येथील मूर्तीकार श्री. संभाजी कुंभार यांनी १३ वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या मूर्तीशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्ती करण्यास प्रारंभ केला. पहिल्या वर्षी त्यांनी केवळ २ मूर्ती सिद्ध केल्या. सध्या श्री. कुंभार यांच्याकडे २५० मूर्तींची मागणी असते. (सर्वच मूर्तीकारांनी सात्त्विक मूर्ती तयार करण्यास प्राधान्य दिल्यास गणेश भक्तही अशाच प्रकारच्या मूर्ती घेतील. पर्यायाने श्री गणेशाला अपेक्षित असा गणेशोत्सव साजरा होईल ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात