१६ व्या वर्षी प्रियव्रत पाटील उत्तीर्ण झाला शास्त्रविषयक अवघड ‘तेनाली महापरीक्षा’ !

नवी देहली – प्रियव्रत पाटील या १६ वर्षांच्या मुलाने संस्कृतमधील सर्वांत अवघड अशी तेनाली महापरीक्षा उत्तीर्ण केली आहे. सर्वांत अल्प वयात ही महापरीक्षा उत्तीर्ण होणार प्रियव्रत हा पहिला मुलगा ठरला आहे. या परीक्षेत विविध १४ स्तरांमध्ये त्याने यश मिळवले आहे.यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे ट्वीट करत कौतुक केले आहे. तेनाली महापरीक्षेचे १४ स्तर असतात आणि वर्षातून २ वेळेस ही परीक्षा होते. जे विद्यार्थी शास्त्रांचे शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ही परीक्षा असते. सौ. अपर्णा आणि श्री. देवदत्त पाटील यांचा तो मुलगा आहे. प्रियव्रत याने त्याच्या वडिलांकडून वेद आणि न्याय यांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर सर्व व्याकरण महाग्रंथांचे श्री. मोहन शर्मा यांच्याकडून शिक्षण घेतले.

ही परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांच्या गुरूंसमवेत देशाच्या विविध भागात रहातात आणि पारंपारिक ‘गृह गुरुकुल’ प्रणालीनुसार शिकतात. वर्षातून दोनदा सर्व गुरु आणि विद्यार्थी त्यांच्या लेखी अन् तोंडी परीक्षेसाठी तेनाली येथे एकत्र येतात. विद्यार्थ्यांच्या ५-६ वर्षांच्या अभ्यासानंतर कांची मठाच्या देखरेखीखाली ही महापरीक्षा घेतली जाते. गेल्या ४० वर्षांमध्ये, शास्त्र ‘तेनाली परीक्षा’ शास्त्र अभ्यासाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था ठरली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात