आत्मा अमर आहे ! – विदेशी शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा निष्कर्ष

जे भारतीय हिंदु संस्कृतीने लक्षावधी वर्षांपूर्वी सांगितलेे आहे, ते आता शास्त्रज्ञ सांगत आहेत ! तरीही भारतातील नतद्रष्ट बुद्धीप्रामाण्यवादी यावर विश्‍वास ठेवणार नाहीत !

नवी देहली – आत्मा अमर आहे, या सिद्धांताला आता शास्त्रज्ञांचेही समर्थन मिळू लागले आहे. ऑक्सफोर्ड विश्‍वविद्यालयाचे भौतिकशास्त्र आणि गणित विषयाचे प्राध्यापक  सर रोगर पेनरोज आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ एरीजोना’चे भौतिकशास्त्राचे शास्त्रज्ञ डॉ. स्टुअर्ट हमरॉफ या दोघा शास्त्रज्ञांनी २० वर्षांच्या संशोधनानंतर निष्कर्ष काढला आहे की, आत्मा कधीही मृत्यू पावत नाही. केवळ शरीर मृत होते. मृत्यूनंतर आत्मा ब्रह्मांडामध्ये परत जातो. त्यात असलेली माहिती कधीही नष्ट होत नाही. या दोघांनी ६ शोधप्रबंध प्रकाशित केले आहेत. यावरून अमेरिकेतील प्रसिद्ध ‘सायन्स’ या दूरचित्रवाहिनीने एक माहितीपटही बनवला आहे. तो लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात