पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्ती आणा ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवाहन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे हेच सांगत आहेत !

मुंबई – प्लास्टर ऑफ पॅरीस आणि कागद यांच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने जलप्रदूषण होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्ती आणा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. यशवंत सोनटक्के यांनी केले.

या वेळी डॉ. यशवंत सोनटक्के पुढे म्हणाले, ‘‘काही वेळा मूर्तींना रंगवण्यासाठी उपयोगात आणलेले रंग रासायनिक असतात. रासायनिक रंगांमध्ये धातूचे अवशेष असतात. ते पाण्यात गेल्यामुळे जलचरांसाठी घातक असतात. जलचरांच्या माध्यमातून त्यातील विषारी रसायन मानवी शरिरापर्यंत पोचू शकते. यासाठी आपण दक्ष रहायला हवे. गणेशोत्सवात सजावट करतांना थर्माकॉल आणि प्लास्टिक यांचा उपयोग करण्याऐवजी नैसर्गिक सजावट करावी. यातून खर्‍या अर्थाने श्रद्धा जपली जाईल आणि पूजा-अर्चा पूर्णत्वाला जाण्याचा आनंद मिळेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात