‘शास्त्रज्ञही अंधश्रद्धाळू असतात !’ – अणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर

श्रद्धा किंवा अंधश्रद्धा कशाला म्हणतात, हे समजण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे ! ‘मिसाईल मॅन’ डॉ. अब्दुल कलाम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ आदींनीही ईश्‍वरी अधिष्ठानाला महत्त्व दिले आहे ! समाजाच्या दृष्टीने हेच खरे शास्त्रज्ञ होत !

डॉ. अनिल काकोडकर

मुंबई – अंधश्रद्धा सामान्य माणसांमध्येच असते, असे नाही. बर्‍याचदा शास्त्रज्ञही अंधश्रद्धाळू असतात, असे मत अणू शास्त्रज्ञ आणि अणू ऊर्जा मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३० व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धेची मुळे समाजात रूतून बसली आहेत. विविध सामाजिक स्तरांवर आणि पातळ्यांवर ती वेगवेगळ्या पद्धतीने पसरली आहेत. ९० च्या दशकात ‘गणपति दूध पितो’, ही अफवा आणि अंधश्रद्धा कशी पसरली अन् त्यानंतर काय काय घडले, ते आपण पाहिलेच आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात