मुंबई आणि नवी मुंबई येथे ‘रामनाम संकीर्तन’ अभियानात सनातन संस्थेचा सहभाग !

 ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाच्या माध्यमातून हिंदूऐक्याची वज्रमूठ !

मुंबई – हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाच्या माध्यमातून हिंदूऐक्याची वज्रमूठ बळकट करण्याची संधी ईश्वरकृपेने प्राप्त झाली आहे. हे अभियान मुंबई, नवी मुंबई येथील मंदिरे, तसेच सनातन संस्थेचे साधक, सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, धर्मप्रेमी आदींच्या निवासस्थानी राबवण्यात आले. यावेळी सर्वांनी एकत्रित येत भावपूर्णपणे ‘श्रीराम जयराम जय जय राम हा नामजप सामूहिकरित्या केला. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी हे अभियान राबवण्यास आरंभ केला आहे.

 

भांडुप

येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. दीपाली उपळेकर यांच्या निवासस्थानी २६ जुलैला घेण्यात आलेल्या रामनामाच्या वेळी १३ जण उपस्थित होते. विशेष म्हणजे या वेळी पुष्कळ पाऊस पडत असूनही जप करण्यासाठी जिज्ञासू आले होते. जप करतांना शांत वाटले.

२८ जुलै या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या वाचक आणि धर्मप्रेमी सौ. प्राची बापर्डेकर यांच्या घरी १८ जणांनी श्रीरामाचा जप केला. या वेळी उपस्थितांना रामनाम, सनातन प्रभात नियतकालिके, नामजप यांचेही महत्त्व सांगण्यात आले. जप करतांना मंत्रमुग्ध झाल्याचा अनुभव घेता आल्याचे उपस्थित धर्मप्रेमी महिलांनी सांगितले. ‘आज दिवसभर पाऊस नव्हता; मात्र जप चालू झाल्यावर तो संपेपर्यंत (३० मिनिटे) पाऊस चालू होता. या माध्यमातून वरुणदेवाचा  आशीर्वाद लाभला’, असे वाटल्याचे सौ. शुभदा राणे यांनी सांगितले. या दिवशी सनातन प्रभातच्या वाचक सौ. परब यांच्याकडे १७ जणांनी नामजप केला. ‘प्रत्येक रविवारी एकत्र येऊन जप करणार’, असे त्यांनी सांगितले.

दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. शरद कदम यांच्या घरी २९ जुलैला करण्यात आलेल्या जपामध्ये ११ जणांनी सहभाग घेतला. या वेळी उपस्थितांसाठी चातुर्मासाविषयी प्रवचनही घेण्यात आले. याविषयी सांगण्यात येत असलेली माहिती धर्मप्रेमी महिला लक्षपूर्वक ऐकत होत्या, तसेच शास्त्रोक्त माहिती प्रथमच ऐकल्याचे उपस्थितांनी सांगितले.

१ ऑगस्टला व्हिलेज रोड येथील श्री दत्त मंदिरात करण्यात आलेल्या जपामध्ये मंदिराचे विश्‍वस्त (ट्रस्टी) श्री. किशोर वैती यांच्यासह १७ जण सहभागी झाले होते. या ठिकाणी पुन्हा हा नामजप घेण्यास सांगण्यात आले, तसेच जप केल्यानंतर वास्तूत प्रचंड शक्ती जाणवत होती, सकारात्मक वाटत होते, असे अनुभवल्याचे उपस्थितांनी सांगितले. याच दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. पनवेलकर यांच्या निवासस्थानी १३ जणांनी नामजप केला. ‘नामजपामुळे अंतर्मुख होता आले’, असे सौ. पनवेलकर यांनी सांगितले.

४ ऑगस्टला सनातन प्रभातचे वाचक श्री. खेडेकर यांच्या घरी नामजप करण्यात आला.

 

 वरळी

प्रभादेवी येथील धर्मप्रेमी सौ. सावंत यांच्या घरी २९ जुलैला करण्यात आलेल्या नामजपात ८ जणांनी सहभाग घेतला. एकत्रितपणे प्रतिदिन १ घंटा जप करण्याचे ठरले आहे. ४ ऑगस्टला सौ. कमळकर यांच्या निवासस्थानी ७ जणांनी नामजप केला. प्रतिदिन ४-५ जण एकत्र येऊन जप करणार आहेत.

 

परळ

श्री महालक्ष्मी सोसायटीतील श्री महालक्ष्मी मंदिरात ३ ऑगस्टला करण्यात आलेल्या जपात १६ जण सहभागी झाले होते. एका जिज्ञासू महिलेचा मुलगा मतीमंद आहे. मुलासह केवळ २ मिनिटे नामजप करू शकते, असे तिने सांगितले होते; परंतु त्या मुलाने ३० मिनिटे एकाच जागी बसून भावपूर्णपणे लयीत नामजप केला.

 

मुलुंड

३१ जुलैला आनंदनगर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात ८ जणांनी नामजप केला. या वेळी ‘शांत वाटले, तसेच घरातील विचार आले नाहीत’, असे उपस्थितांनी सांगितले.

 

नवी मुंबई – नेरूळ

सेक्टर ६ येथील झुलेलाल मंदिरामध्ये ३१ जुलैला नामजप करण्यात आला. मंदिराच्या पुजार्‍यांनी उपस्थित नामजपात सहभागी झालेल्या २५ जणांना सनातन संस्थेविषयी माहिती सांगितली. ती उपस्थितांनी अधिक उत्सुकतेने ऐकली, तसेच त्यांनी एकलयीत जपही केला. सलग ८ दिवस हे अभियान घेण्यासाठी अनुमती दिली आहे. १ ऑगस्टला याच मंदिरात घेण्यात आलेल्या जपामध्ये ५० जण सहभागी झाले होते.

 

खारघर

२ ऑगस्ट या दिवशी सौ. संगीता जामदार यांच्या घरी काही जणांनी एकत्र येत नामजप केला. अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी नामजप केला जाणार आहे.

 

ऐरोली

१ ऑगस्टला सौ. स्वाती साळुंखे यांच्या घरी ११ जणांनी नामजप केला. उपस्थितांनी प्रतिदिन १ घंटा जप करणार असल्याचे सांगितले. उपस्थित धर्मप्रेमी महिलांना जप करतांना श्रीरामाची मूर्ती आणि पिवळा प्रकाश दिसल्याची अनुभूती आली. सेक्टर ३ येथील श्री रामेश्‍वर महादेव मंदिर येथे २ ऑगस्ट या दिवशी मारवाडी भजनी महिला मंडळाच्या वतीने नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. यात २५ जण सहभागी झाले होते. रक्षाबंधनपयर्ंत नामजप करूया, असे सांगण्यात आले.

 

सानपाडा

‘श्री माउली ज्ञानेश्‍वर हरिपाठ आणि भजन मंडळी’ यांच्या वतीने २ ऑगस्टला येथील दत्त मंदिरात नामजप करण्यात आला. ‘आठवड्यातून एकदा ‘रामनाम संकीर्तन’ हरिपाठासह करणार’, असे श्री दगडू जोमा वास्कर यांनी सांगितले. या वेळी १६ जण उपस्थित होते. ४ ऑगस्टला ‘गजानन महिला भजनी मंडळा’च्या वतीने श्री गणेश मंदिरात

१५ जणांनी नामजप केला. त्यांनी आठवड्यातून एकदा नामजप करण्याची सिद्धता दर्शवली.

 

कोपरखैरणे

वरदविनायक मंदिरात ३ ऑगस्टला १९ जणांनी नामजप केला. या वेळी नागपंचमीविषयी माहिती सांगण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात