अमेरिका आणि युरोप येथे तणाव दूर करण्यासाठी गायीसमवेत वेळ घालवण्याचा उपाय होत आहे लोकप्रिय

नवी देहली – जागतिक स्तरावर लोकांमध्ये तणाव वाढत आहे. विविध कारणांमुळे निर्माण होणार्‍या तणावामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी अमेरिका आणि युरोप येथील देशांमध्ये गोमातेसमवेत वेळ घालवण्याचा उपाय करून हा तणाव दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे.

१. ‘काऊ कडलिंग’ (गायीचे लाड करणे) हा प्रकार प्रसिद्ध होत आहे. युरोपातही हा प्रकार लोकप्रिय होत आहे. यात व्यक्ती गायीजवळ शांत वातावरणात वेळ घालवतेे आणि त्याच्या सर्व समस्या विसरून जाते.

२. अमेरिकेत याची मागणी वाढत आहे. न्यूयॉर्कमध्ये ही सुविधा चालू करण्यात आली आहे. एका घंट्यासाठी ७५ डॉलर (अनुमाने ५ सहस्र २०० रुपये) द्यावे लागत आहेत. सध्या न्यूयॉर्कच्या ३३ एकर जागेतील ‘फॅले माऊंटेन हाऊस फार्म’मध्ये ही सुविधा चालू आहे.

३. या फार्मच्या मालकीण वूलर्स या मूळच्या नेदरलॅण्डमधील आहेत. ‘गायींसमवेत वेळ घालवल्यावर आरोग्यावर चांगला परिणाम होतो’, याची माहिती झाल्यावर त्यांनी नेदरलॅण्डवरून २ गायी आणून ‘काऊ कडलिंग’ चालू केले.

४. वूलर्स म्हणाल्या की, अमेरिकेतील लोकांना गायींसमेवत वेळ घालवण्यावर होणार्‍या लाभांची माहिती नाही, हे मलाच ठाऊक नाही. त्यांना कुत्रे आणि मांजरी यांच्यासमवेत वेळ घालवणे इतकेच ठाऊक होते. ते गायीसारख्या मोठ्या प्राण्यांपासून दूरच रहातात.

५. गायीचा शांत वावर लोकांना आरामदायक वाटतो. तिच्या समवेत एका शांत वातावरणात रहाण्याने लोकांना चांगले वाटते. येथे ‘काऊ कडलिंग’ची दिवसभरात दोनच सत्रे होतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात