नक्षलवाद्यांशी संबंध असणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर कारवाई करा ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

गेली 6 वर्षे दाभोलकर-पानसरे हत्येसंदर्भात सीबीआय आणि विशेष तपास पथके तपास करत आहेत; मात्र एकाही यंत्रणेला सनातन संस्थेच्या सहभागाचा काहीही पुरावा मिळालेला नाही. पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाड यांना 19 महिन्यांनी जामिनावर मुक्त करण्याची वेळ आली, तसेच तीन वर्षांनंतरही डॉ. तावडे यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी एकही पुरावा यंत्रणांकडे नाही. सतत बदलणारे आरोपी, मास्टरमाईंड आणि कथानके पाहता तपासाचा विचका झालेला आहे. त्यामुळेच दोन्ही खटले न्यायालयात चालवा, असे म्हणण्याचे नैतिक धैर्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे नाही. खटले चालवण्यापेक्षा त्यावर स्थगिती आणून वेळकाढूपणा करण्याचे तंत्र अंनिसने अवलंबले आहे. आता ‘20 ऑगस्ट’ जवळ येत असल्यामुळे नेहमीप्रमाणे ‘आम्ही म्हणू तेच खरे !’ आणि ‘आम्ही सांगू तेच गुन्हेगार !’ अशा अविवेकी वृत्तीतून सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर कारवाईची मागणी अंनिसने केली आहे. आतापर्यंत अंनिसचा यंत्रणांवर विश्‍वास नव्हता, आता न्यायालयावरही त्यांचा विश्‍वास राहिलेला नाही, असेच दिसते. खरे तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इतिहास पहाता, त्यांचे कार्यकर्ते हे नक्षलवादी कारवायांत सहभागी असल्याच्या कारणावरून अटक झालेले आहेत, ‘एफसीआरए’कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची ‘एफसीआरए’ मान्यता शासनाने रद्द केली, ‘नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍या संस्थां’च्या गृहमंत्रालयाच्या सूचीत अंनिसचे नाव होते, त्यामुळे अशा नक्षल समर्थक अंनिसवरच शासनाने कारवाई करायला हवी, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केली आहे.

‘प्रथम आरोपी ठरवा आणि त्याप्रमाणे पुरावे गोळा करा’, असा अंनिसचा उरफाटा न्याय आहे. अंनिसच्या अविनाश पाटील यांनी सनातनवर कारवाई मागणी करतांना ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही’, असे अत्यंत बेजाबदारपणाचे विधान केले.दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेल्या मनिष नागोरी आणि विकास खंडेलवाल या शस्त्रतस्कारांना जामीन मिळाला, तेव्हा मुकेबहिरे झालेल्या अविनाश पाटलांना लाज नाही वाटली ! विदेशांतून पैसे घेण्याची अनुमती नसतांना पैसा जमा केला, ‘वैज्ञानिक जाणिवां’च्या नावाखाली शाळांतून अनधिकृतपणे पैसा गोळा केला, विविध घोटाळ्यांप्रकरणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अंनिसच्या न्यासावर प्रशासक नेमण्याची शिफारस केली, तेव्हा अविनाश पाटलांना लाज वाटली नाही का, असा प्रश्‍नही श्री. राजहंस यांनी केला.

आपला नम्र,

श्री. चेतन राजहंस,

राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था,

(संपर्क : 7775858387)