बीकानेर (राजस्थान) येथील गुरुपौर्णिमा महोत्सव आणि संवित साधक संमेलन यांमध्ये सनातनचे ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन

१. महंत स्वामी संवित सोमगिरी महाराज यांच्या दर्शनाच्या वेळी २. सौ. राखी मोदी, ३. सौ. अर्चना लढ्ढा, ४. श्री. दीपक लढ्ढा आणि ५. श्री. यश खत्री

बीकानेर (राजस्थान) – शिवबाडी, बीकानेरच्या श्री लालेश्‍वर महादेव मंदिरामध्ये १४ ते १६ जुलै या कालावधीत गुरुपौर्णिमा महोत्सव आणि संवित साधक  संमेलन आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी सनातन संस्थेच्या सौ. राखी मोदी यांनी येथील श्री लालेश्‍वर महादेव मंदिराचे महंत स्वामी संवित सोमगिरी महाराज यांना ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ हा हिंदी ग्रंथ भेट दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात