महाराष्ट्रात भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव सोहळा पार पडला. या महोत्सवात चैतन्यदायी आणि भावपूर्ण वातावरण अनुभवता आले.

 

पुणे – थेरगांव (चिंचवड)

नक्षलवाद हे साम्यवादाचेच फळ आहे  ! – अधिवक्ता
वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

साम्यवाद आणि नक्षलवाद हे दोन्ही वेगळे नसून नक्षलवाद हे साम्यवादाचेच फळ आहे. हिंदु राष्ट्राच्या संदर्भात प्रश्‍न विचारणार्‍या साम्यवाद्यांना ‘तुमचा साम्यवाद का अयशस्वी झाला ?’, असा प्रतिप्रश्‍न विचारायला हवा. हिंदूंच्या प्रथांविषयी निर्णय द्यायला सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ आहे; पण इतर धर्मियांच्या रूढींविषयी बोलायला वेळ नाही. हिंदु राष्ट्राची मागणी असंवैधानिक नाही. नक्षलवाद आणि आतंकवाद यांपासून भारताला मुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे आहे.

सनातन संस्थेच्या ८५ व्या संत पू. (सौ.) संगीता पाटील यांची कार्यक्रमाला वंदनीय उपस्थिती होती.

कार्यक्रमस्थळी साध्या वेषातील पोलीस उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाची छायाचित्रे काढली.

 

जुन्नर (पुणे)

उपस्थित मान्यवर : ह.भ.प. प्रमोद महाराज घोडेकर, ह.भ.प. मुरकुटे महाराज, प्रजापिता ईश्‍वरीय विद्यालय ओम शांतीचे श्री. रामेश्‍वर परदेशी, भाजपचे पुणे जिल्हा चिटणीस श्री. सुनील शहा, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री रमेश कर्पे, वनवासी कल्याण आश्रमाचे श्री. चंद्रहास श्रोत्री, जुन्नरचे शिवसेनेचे नगरसेवक श्री. समीर भगत, जुन्नरच्या माजी नगराध्यक्षा सौ. भारती मेहेर, अधिवक्ता नंदकुमार चौधरी, जुन्नर पोलीस ठाण्याचे हवालदार श्री. संतोष मुळूक, धर्माभिमानी युवा उद्योजक श्री. किरण शेटे, अधिवक्ता राजेंद्र बुट्टे पाटील

वैशिष्ट्यपूर्ण

१. ब्राह्मण बुधवार पेठ येथील कुंता माता कन्या छात्रालय आणि संत गाडगे महाराज विद्यार्थी वसतीगृह येथील १२० विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

२. सनातन प्रभातचे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘गुरुतत्त्व एकच असते’ हे अनुभवणार्‍या अन्य संप्रदायातील साधिका !

कलावतीआईंच्या साधिका सौ. स्मिता कोठस्थाने आणि स्वामी समर्थांच्या उपासक श्रीमती प्रभा तांबडे या गुरुपौर्णिमेच्या सेवांमध्ये मनापासून सहभागी झाल्या. त्या वेळी ‘गुरुतत्त्व एकच आहे’, अशी त्यांना अनुभूती आली.

 

तळेगाव (पुणे)

या सोहळ्याला सनातन संस्थेच्या ८१ व्या संत पू. पार्वती ननावरे आजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

वैशिष्ट्यपूर्ण

१. हितचिंतक श्रीमती स्मिता शेळके यांना कार्यक्रमस्थळी प्रसन्नता जाणवली. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामुळे सभागृहात पुष्कळ पालट झाल्याचे जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. (श्रीमती शेळके यांनी अपूर्वा गार्डन मंगल कार्यालयाचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले होते.)

२. श्री. दादा गुळमे यांनी ‘मी ‘जागो’चे १०० लघुसंदेश पाठवू शकतो’, असे सांगितले.

३. प्रथमोपचार कक्षाला भेट देणारे श्री. उदय लिमये यांनी प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले, तसेच ‘प्रथमोपचार शिबीर आयोजित करतो’, असेही सांगितले.

 

धनकवडी (पुणे)

ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी तन, मन, धन अर्पण करून प्रयत्न करा ! – अधिवक्ता नीलेश निढाळकर

भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे. ५ सहस्रांहून अधिक वर्षांचा इतिहास हिंदूंना लाभला आहे; परंतु हिंदू संघटित नसल्यामुळे ते अल्पसंख्य होत चालले आहेत. हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदूसंघटन ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. हिंदुत्वाच्या कार्यात विविध अडथळे येऊनही कार्यात मिळणारे यश पाहिल्यावर असे निश्‍चितच वाटते की, ही हिंदु राष्ट्राची नांदी आहे. त्यामुळे सर्वच हिंदूंनी ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठीच्या या दैवी कार्यात तन, मन, धन अर्पण करून प्रयत्न करण्याचा संकल्प गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी करा !

या सोहळ्याला सनातन संस्थेच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

साध्या वेशातील पोलिसांकडून सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक

साध्या वेशातील पोलिसांनी  कार्यक्रमाची छायाचित्रे काढली, तसेच सनातन संस्थेची उत्पादनेही खरेदी केली. ‘सनातन संस्थेचे आध्यात्मिक कार्य चांगले आहे’, असेही त्यांनी सांगितले.

 

सांगवी

ईश्‍वरी राज्याच्या निर्मितीतच हिंदूंचा खरा सन्मान ! –  डॉ. नीलेश लोणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंच

१९४७ पर्यंत भारत हिंदु राष्ट्र होते, आता काय आहे ? तत्कालीन सरकार निधर्मीही नव्हे, तर त्यांनी केवळ अल्पसंख्यांकाचे लांगूलचालन केले. आजच्या शिक्षणप्रणालीने व्यक्तीला माणूस म्हणून घडवता येत नाही. त्याची पोट भरायची व्यवस्थाही होत नाही. आज गोहत्या थांबवायच्या असतील, तर ईश्‍वरी राज्य आणणे आवश्यक आहे. ईश्‍वरी राज्याच्या निर्मितीतच हिंदूंचा खरा सन्मान आहे.

कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या संत पू. (श्रीमती) माया गोखले आजींची वंदनीय उपस्थिती लाभली होती.

नगरसेवक श्री. राजेंद्र राजापुरे हेही या वेळी उपस्थित होते.

क्षणचित्र – प्रदर्शन कक्षात ७० वर्षांच्या एक आजी तेथील फलक अत्यंत जिज्ञासू वृत्तीने वाचत होत्या.

 

कोथरूड (पुणे)

हिंदु धर्मच विश्‍वाचे कल्याण करेल ! – अधिवक्ता मोहनराव डोंगरे

आपण भाग्यवान आहोत की, आपल्याला भारतात जन्म मिळाला. आपण त्याहून भाग्यवान की, आपल्याला हिंदु धर्मात जन्म मिळाला. आपल्या धर्मात ज्ञानाचे भांडार आहे. केवळ हिंदु म्हणून नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठ म्हणून जगा. आपल्या धर्माचे रक्षण केले, तरच धर्म आपले रक्षण करतो. एकमेव हिंदु धर्मच विश्‍वाचे कल्याण करू शकतो.

उपस्थित मान्यवर : नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक श्री. सुशीलभाऊ मेंगडे, नगरसेवक श्री. जयंत भावे

क्षणचित्र – अधिवक्ता मोहनराव डोंगरे यांनी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून त्यांच्या मार्गदर्शनाला प्रारंभ केला.

 

शिरवळ (पुणे)

वारकरी संप्रदाय नेहमीच सनातन संस्था आणि
हिंदु जनजागृती समिती यांच्या पाठीशी आहे ! – ह.भ.प. संजय महाराज खुटवड

‘श्रीगुरु असता पाठीशी । इतरांचा लेखा कोण करी ।’ याचप्रमाणे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला कितीही विरोध झाला, तरी साक्षात गुरुतत्त्व, गुरूंचा आशीर्वाद पाठीशी आहे. साक्षात ईश्‍वरी कार्य करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या पाठीशी वारकरी संप्रदाय नेहमीच आहे. आपण सर्वांनीही या कार्यात सहभागी होऊया.

हिंदु धर्म आणि संस्कृती आज लोप पावत आहे; पण जे हिंदु धर्मकार्य करत आहेत, त्यांना साक्षात ईश्‍वरानेच त्याच्याशी जोडलेले आहे. श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण केले, हाच आदर्श घेऊन सर्वांनी धर्माचरण आणि धर्मरक्षण करण्याची आवश्यकता आहे.

उपस्थित मान्यवर : प्रतापगड उत्सव समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. श्री. विनायक काका सणस, वीर धाराऊ माता प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री. मयूर गाडे आणि इतर पदाधिकारी, विंग गावच्या सरपंच सौ. विनिता तळेकर, शिरवळ येथील श्रीराम सेनेचे मा. श्री. गजानन कुलकर्णी, एफर्ट इन्स्टिट्यूटचे संचालक मा. भोसले सर

वैशिष्ट्यपूर्ण

१. कार्यक्रमानंतर वक्त्यांशी चर्चा करण्यासाठी १२ पुरुष आणि १० महिला उपस्थित होत्या.

२. खंडोबाचीवाडी येथील धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या महिलांनी धर्मशिक्षणवर्गात आल्यानंतर स्वतः मध्ये झालेला पालट, धर्म कार्याची वाढलेली तळमळ यांविषयी मनोगत व्यक्त केले.

३. खंडोबाची वाडी, पिसाळवाडी, शिरवळ, विंग, नसरापूर, मिरजेवाडी येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी उपस्थित होते.

 

सिंहगड रस्ता (पुणे)

युवकांनो, ‘सेल्फी’मध्ये रमण्यापेक्षा राष्ट्र-धर्माच्या
कार्याला हातभार लावा ! – विद्याधर नारगोलकर, सावरकर स्मृती प्रतिष्ठान

१ मिनिट ट्रॅफिक सिग्नलला थांबू न शकणार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्याकडून  शिस्त अन् वेळेचे नियोजन शिकायला हवे. युवकांनो, ‘मोबाईल-सेल्फी’ यात रमण्यापेक्षा समर्थ रामदासस्वामी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेत राष्ट्र-धर्माच्या कार्याला हातभार लावा.

श्री. विद्याधर नारगोलकर यांच्याकडून
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एखादी गोष्ट ठरवली की, ती गोष्ट पार पडल्याविना ते थांबायचे नाहीत. त्याचप्रमाणे हिंदु जनजागृती समितीचे कार्य आहे. हिंदु जनजागृती समितीने वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळे हिंदु देवतांची नग्न चित्रे काढणार्‍या एम्.एफ्. हुसेनला देशाबाहेर जावे लागले. सर्व मानवाच्या कल्याणासाठी हिंदु जनजागृती समिती सर्व बाजूंनी आणि सर्व क्षेत्रांत मोठे कार्य करत आहे.

कार्यक्रम स्थळी सनातन संस्थेच्या ५८व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळे आजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली

वैशिष्ट्यपूर्ण – ८० वर्षांच्या एक आजी कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत थांबल्या होत्या. त्यांनी ‘स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके आवडली’, असा अभिप्राय लिहून दिला.

 

अमरावती

हिंदु जनजागृती समितीचे कार्य कौतुकास्पद ! – रमेश छांगानी, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय हिंदु महासभा

हिंदु जनजागृती समितीचे कार्य कौतुकास्पद आणि उत्तम आहे. या कार्यात मला सहभागी होण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.

उपस्थित मान्यवर : हिंदु क्रांती सेनेचे विदर्भ अध्यक्ष श्री. हेमंत मालवीय, विदर्भ सचिव श्री. राज गणेशकर, भाजपचे नगरसेवक श्री. अजय सारसकर, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता राजेंद्र पांडे, दिलीपबाबू गणोरकर मठाचे मठाधिपती श्री. दिलीपबाबू गणोरकर, श्रीराम सेनेचे श्री. प्रमेंद्र शर्मा, श्री. जुगल ओझा, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. मुकुल कापसे, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. निषाध जोध

 

पेण (रायगड)

अधिवक्त्यांना अटक करणे म्हणजे त्यांच्या अधिकारांवर आणलेली गदाच !
– अधिवक्ता जयंत चेऊलकर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय विधीज्ञ परिषद रायगड

सध्या सर्व हिंदूंची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केलेली अटक निषेधार्ह असून अधिवक्त्यांना अटक करणे म्हणजे त्यांच्या अधिकारांवर आणलेली गदाच आहे.

क्षणचित्र – ‘औषधी वनस्पतींची लागवड करा’ हा विशेष कक्ष येथे उभारण्यात आला होता.

 

पनवेल

उपस्थित मान्यवर : कळंबोली येथील भीमा कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष श्री. रामदास शेवाळे, गौरव क्लासचे श्री. संतोष वर्तक आणि सौ. प्रतिभा वर्तक, श्री संप्रदायाचे श्री. शिवाजी जाधव

 

यवतमाळ

उपस्थित मान्यवर : शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. पिंटू बांगर, हिंदुत्वनिष्ठ आणि चिंतामणी ट्रॅव्हल्स समूहाचे श्री. अमित जैस्वाल,  नेत्रतज्ञ डॉ. सुबोध पुरोहित

 

वणी

‘मी आपल्यापैकीच एक आहे. गुरुदेव मला शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्याशी जुळवून ठेवणार आहेत. या अविस्मरणीय गुरुपौर्णिमा महोत्सवात मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली, म्हणून कृतज्ञता !’ असे कार्यक्रमाला उपस्थित असणारे विशेष अतिथी श्री. सुभाष उसेवार यांनी सांगितले.

 

गडहिंग्लज  (कोल्हापूर)

हिंदु राष्ट्र स्थापनेत सहभागी होणे हीच खरी गुरुदक्षिणा ! – किरण कुलकर्णी, कागल शहरप्रमुख, शिवसेना

हिंदुबहुल देशात हिंदू असुरक्षित आहेत. अमरनाथ यात्रेला जाणार्‍या २ लाख भाविक हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी सहस्रो सैनिक लागतात, तर अजमेरच्या यात्रेत ५ लाखांहून अधिक यात्रेकरू जात असून त्यासाठी केवळ ३०० पोलीस असतात. त्यामुळे या देशात खरे असुरक्षित कोण, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. हिंदु राष्ट्र स्थापनेत सहभागी होणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे.

 

निपाणी (बेळगाव )

अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक केली, तर
देशभरातून अनेक पुनाळेकर उभे रहातील ! – अधिवक्ता प्रकाश खोंद्रे

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांना न्यायालयीन मार्गाने रोखण्यासाठी हिंदु विधिज्ञ परिषदेची स्थापना झाली. परिषदेच्या प्रयत्नांमुळे अनेक मंदिरांतील घोटाळे उघड झाले. हिंदु विधीज्ञ परिषद ही निर्दोष हिंदुत्वनिष्ठांचे न्यायालयीन खटले लढवते. संशयित आरोपी आणि त्याचा अधिवक्ता यांच्यातील संभाषण हे घटनात्मक दृष्टीने संरक्षित असते; पण तरीही ‘सीबीआय’ने परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता पुनाळेकर यांना अन्यायपूर्ण अटक केली. या अन्वेषण यंत्रणांनी जर एका अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक केली, तर देशभरातून अनेक पुनाळेकर उभे रहातील आणि हिंदूंसाठीचा न्यायालयीन लढा सर्वशक्तीनिशी लढवला जाईल.

 

संभाजीनगर

धर्म परंपरेचे पालन, संवर्धन आणि हिंदूंच्या न्याय्य हक्कासाठी
ईश्‍वरी राज्य स्थापन करणे आवश्यक ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

लोकशाही राज्यव्यवस्था आपण स्वातंत्र्यानंतर स्वीकारली. तत्पूर्वी दैदिप्यमान भारतीय संस्कृती, परंपरा, वैभव हे भारताकडे होते. भारताचे अनेक तुकडे पडले. आजही काश्मीर कधी जाईल, याची निश्‍चिती नाही. त्यामुळे धर्म परंपरेचे पालन, संवर्धन आणि हिंदूंच्या न्याय्य हक्कासाठी ईश्‍वरी राज्य स्थापन करणे आवश्यक आहे.

क्षणचित्र – ७८ वर्षे वयाच्या एका आजींचा पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या महिलांना एकत्रित बोलावून प्रत्येक उपक्रमासाठी सर्वांना उद्युक्त करतात.

 

सोलापूर जिल्ह्यातील गुरुपौर्णिमा महोत्सव

साम्यवाद हे आधुनिक विचारवंतांनी निर्माण केलेले थोतांड आहे ! – भागवताचार्य वा.ना. उत्पात

लोकांना मनुस्मृती केवळ जाळणे ठाऊक आहे. ती वाचण्याची कोणाचीही सिद्धता नसते. जगात काहीच सारखे नाही, दोन भाऊही सारखे नसतात. आपल्या ग्रंथांचा अभ्यास करा. साम्यवाद हे आधुनिक विचारवंतांनी निर्माण केलेले थोतांड आहे. असे मार्गदर्शन भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी सोलापूर येथे केले.

साधना करणारी व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांचे
रक्षण करू शकते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रसारक, सनातन संस्था

साधना करणारी व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करू शकते. त्यामुळे हिंदु राष्ट्र हवे असल्यास साधना करणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमादिनी ईश्‍वरी राज्य स्थापन करण्याचा निश्‍चय करा.

विशेष

१. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी उपस्थितांना ‘हिंदु राष्ट्र हवे कि नको ?’, असे विचारल्यावर सर्वांनी एकमुखाने ‘हो’ म्हणून अनुमोदन दिले.

२. बार्शी (जिल्हा सोलापूर) – येथील सोहळ्यात सनातन संस्थेच्या संत पू. (श्रीमती) पुतळाबाई (माई) देशमुख यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

 

अंबाजोगाई (जिल्हा बीड)

उपस्थित मान्यवर – नगरसेवक श्री. संजय गंभीरे, अधिवक्ता श्री. अशोक मुंडे, श्री. श्रीनिवास कुलकर्णी, श्री. चौधरी भागवताचार्य वा.ना. उत्पात

 

ठाणे आणि डोंबिवली येथे झालेला गुरुपौर्णिमा महोत्सव

ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्यात प्रत्येक हिंदूने समर्पित
भावाने सहभागी व्हावे ! – दिप्तेश पाटील, हिंदु गोवंश रक्षा समिती

भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र असूनही धर्मनिरपेक्षपणा आपल्यावर लादला गेला आहे; मात्र तरीही हिंदूंना एक आणि इतर पंथियांना वेगळा न्याय दिला जातो. धर्मनिरपेक्षपणाचा भंपकपणा समजून घेऊन हिंदूंवर होणारे आघात रोखण्यासाठी सिद्ध होण्याची वेळ आज आली आहे. यावर ईश्‍वरी राज्य हा एकमेव पर्याय आहे. ईश्‍वरी राज्य स्थापनेच्या कार्यात प्रत्येक हिंदूने समर्पित भावाने सहभागी व्हावे !

 

औषधी वनस्पतीच्या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घेताना पितांबरी उद्योग समूहाचे श्री. रवींद्र प्रभुदेसाई
उपस्थित मान्यवर

पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई, शिवसेनेच्या नगरसेविका सौ. राधिका राजेंद्र फाटक, ब्राह्मण विद्यालयाचे चिटणीस श्री. केदार जोशी, उपाध्यक्षा श्रीमती सोमण

 

डोंबिवली

परकियांचा कावा ओळखून हिंदूंनी जागृत होणे
आवश्यक ! – वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद तज्ञ तथा लेखक आणि व्याखाते

सत्ययुगापासून ते कलियुगापर्यंत गुरु-शिष्य परंपरेची अनेक उदाहरणे आहेत. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यास लाभ होतो. जगातील कोणत्याही संस्कृतीत अशी परंपरा नाही, इतकी वैभवशाली परंपरा आपल्याला लाभली आहे; मात्र आज परकियांकडून हिंदु संस्कृतीवर आक्रमणे होत आहेत. त्यामागील कावा हिंदूंनी समजून घेऊन जागृत झाले पाहिजे.

येथे सनातन संस्थेच्या ५६ व्या संत पू. (श्रीमती) आनंदी पाटीलआजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

उपस्थित मान्यवर

अस्थीरोग तज्ञ डॉ. जयंत गोखले, भाजपचे भूतपूर्व मंत्री श्री. जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे नगरसेवक श्री. राजेश मोरे, शिवसेनेचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन सदस्य श्री. बंडू पाटील, शिवसेना विधानसभा शहर संघटक श्री. तात्या माने, ज्योतिष तज्ञ श्री. निंबालाल सोनवणे, उद्योजक श्री. अजय भारंबे

क्षणचित्र

ब्राह्मण विद्यालय शाळेतील १० शिक्षिका गुरुपूजनाच्या ठिकाणी आल्यावर त्यांना प्रसन्न वाटून चैतन्य जाणवले. त्यांनी सनातन संस्थेचे कार्य समजून घेऊन प्रत्येक मासाच्या शेवटी सनातन संस्थेची उत्पादने घेऊन त्यांच्या शाळेत बोलावले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात